प्राथमिक विभागात जैन इंग्लिश स्कूल आणि माध्यमिक विभागात आदर्श विद्या मंदिरची बाजी कलापिनीमधील बालनाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे
“नाट्यकलेत विशेष प्राविण्य प्राप्त करायचे असेल तर शालेय विद्यार्थ्यांनी कलापिनी मधील नाट्यकला शिबिरांचा उपयोग करून घ्यावा आणि आपले ध्येय गाठावे..” असे मनोगत मा. श्री. श्रीशैल मेंथे यांनी कलापिनीच्या कै. शं. वा. परांजपे स्मृती बालनाट्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
कलापिनीमध्ये दोन दिवस ही बालनाट्य स्पर्धा चालू होती. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली.बालनाट्य स्पर्धा भरवण्याचे हे कलापिनीचे ४८ वे आहे. मावळ भागातील २०० ते २५० विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होते. या बालनाट्य स्पर्धांचे परीक्षण प्रसाद पूर्णपात्रे , अपर्णा मणकीकर, सुहास जोशी , ज्योती देशपांडे आणि अमृता जोगदेव यांनी केले.
शालेय शिक्षणाबरोबरच मुलांनी आपल्या कलाही जोपासाव्यात. आपले कलागुण सादर करण्याची त्यांना संधी मिळावी. या उद्देशाने कलापिनी दरवर्षी हा स्पर्धा आयोजित करत असते.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी केले.. संस्थेचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांनी आपल्या मनोगतातून सर्व बालकलाकारांना खूप शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष अशोक बकरे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास स्पर्धक, पालक आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. डॉ. शं. वा. परांजपे स्मृती आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा, २०२६( वर्ष ४८वे )
प्राथमिक विभाग निकाल
सांघिक
प्रथम : मुलांचे मुलांसाठी ,
शाळा जैन इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे.
द्वितीय : आम्ही करायचे तरी काय?, शाळा सिटी प्राइड इं.
स्कूल, रावेत.
तृतीय : काळ नगरीची सफर,
शाळा सह्याद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे.
उत्तेजनार्थ : केल्याने होत आहे रे
शाळा पैसा फंड (अ) विभाग, तळेगाव दाभाडे.
उत्तेजनार्थ: नवी दृष्टी,
शाळा भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय,पिंपरी.
लक्षवेधी प्रयत्न सांघिक :
पृथ्वी आणि ग्रहमाला, शाळा सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे.
ग्रामीण प्रोत्साहन पर : मोबाईलचा भस्मासुर,
शाळा सरस्वती विद्यामंदिर, इंदोरी ता. मावळ.
लेखन
प्रथम : विलास गुंजाळ, नवी दृष्टी शाळा भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय, पिंपरी.
द्वितीय : संतोष गायकवाड, रेणुका पाटील,आम्ही करायचे तरी काय?
शाळा सिटी प्राइड इं. स्कूल, रावेत.
दिग्दर्शन
प्रथम : संतोष गायकवाड,रेणुका पाटील, आम्ही करायचे तरी काय?, सिटी प्राइड इं. स्कूल, रावेत.
द्वितीय : अमिता योगेंद्र शिळीमकर, मुलांचे मुलांसाठी ,
शाळा जैन इंग्लिश स्कूल , तळेगाव दाभाडे.
तृतीय : मेघना श्रीकांत वीरकर, काळ नगरीची सफर,
शाळा सह्याद्री इंग्लिश स्कूल , तळेगाव दाभाडे.
संगीत
प्रथम :श्वेता गोपाळे, मुलांचे मुलांसाठी ,शाळा जैन इंग्लिश स्कूल , तळेगाव दाभाडे.
द्वितीय:मुकुंद आपटे व सीमा आवटे, केल्याने होत आहे रे
पैसा फंड (अ) विभाग, तळेगाव दाभाडे.
वेशभूषा/ रंगभूषा
प्रथम : आरती चौघुले,जैन इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे
द्वितीय : निकीता गिरीश पाटील, सह्याद्री इंग्लिश स्कूल , तळेगाव दाभाडे.
रंगमंच रचना
प्रथम : निकीता गिरीश पाटील सह्याद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव ,
द्वितीय : आरती चौघुले,जैन इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे.
अभिनय ( मुले)
प्रथम : आदित्य कदम,
भू. – सरपंच , आम्ही करायचे तरी काय? शाळा सिटी प्राइड इं. स्कूल, रावेत.
द्वितीय: ऋग्वेद सुमित आपटे, भू. – झिपरु, मुलांचे मुलांसाठी, शाळा जैन इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे.
तृतीय: अनय सागर खुमसे,
भू. – प्रसाद ,केल्याने होत आहे रे
शाळा पैसा फंड अ विभाग, तळेगाव दाभाडे.
उत्तेजनार्थ: समर्थ जीवन वाडेकर , भू. – अनाउंसर, मुलांचे मुलांसाठी ,शाळा जैन इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे.
लक्षवेधी मुलगा
स्वरांग मंगेश साळुंखे, भू. – सूत्रधार ,एक घर एकविसाव्या शतकातील, शाळा पैसा फंड ब विभाग, तळेगाव दाभाडे.
अभिनय ( मुली)
प्रथम : ओवी वीर, भू.- सायली, काळ नगरीची सफर, शाळा सह्याद्री इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे.
द्वितीय: क्रितिका प्रशांत पवार,
भू. – गावकरी स्री, आम्ही करायचे तरी काय?, शाळा सिटी प्राइड इं. स्कूल, रावेत.
तृतीय: स्वरा गौरव वालझडे,
भू. – रिमा, मुलांचे मुलांसाठी शाळा जैन इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे.
उत्तेजनार्थ श्रीमयी श्रेयस वायचळ, भू. – आई, आम्ही करायचे तरी काय?, शाळा सिटी प्राइड इं. स्कूल, रावेत.
उत्तेजनार्थ: प्रियदर्शनी यमनप्पाा कैरवाडगी, भू. – मुलगी, चम चम चमको, शाळा आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.
लक्षवेधी मुलगी
: श्रेया सतीश पुकळे, भू. – आरोही, केल्याने होत आहे रे शाळा पैसा फंड, अ विभाग , तळेगाव दाभाडे.
कै. डॉ. शं. वा. परांजपे स्मृती आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा २०२६ ( वर्ष ४८ वे ) निकाल
माध्यमिक विभाग
सांघिक प्रथम : कणकण में भारत बसता है|
आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.
सांघिक द्वितीय : ‘पहाट ‘
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी.
सांघिक तृतीय : भूमिका,
डी.आय.सीज.इंग्लिश स्कूल,निगडी
सांघिक उत्तेजनार्थ : हनुमान,
भैरवनाथ विद्यालय, दोंदे,ता.खेड
सांघिक उत्तेजनार्थ : सिंहगडाला जेव्हा जाग येते, रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन, तळेगाव दाभाडे.
सांघिक लक्षवेधी पुरस्कार : या टोपीमध्ये दडलंय काय?
एस.ई.सी.सेंटर अस्थिव्यंग – दिव्यांग शाळा ,नायगाव, मावळ
दिग्दर्शन:
प्रथम : पहाट , श्रुती कुलकर्णी,
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी.
द्वितीय : प्रतिक्षा ढवळे व सुजाता डावखरे, कणकण में भारत बसता है|. आदर्श विद्यामंदिर , तळेगाव दाभाडे.
तृतीय : नंदिनी चौधरी व गायत्री जोशी, ‘भूमिका’, डी.आय. सीज. इंग्लिश स्कूल, निगडी.
लेखन
प्रथम : क्षिप्रसाधन भरड, कणकण मे भारत बसता है,
आदर्श विद्या मंदिर ,तळेगाव दाभाडे
द्वितीय : चित्रा देशपांडे, एकांकिका – ‘भूमिका’,
डी.आय.सीज.इंग्लिश स्कूल, निगडी.
संगीत
अर्णव पुरोहित व शांभवी दलाल, पहाट , ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी.
रंगभूषा/वेशभूषा
प्रथम : धनश्री कांबळे, जाई गायकवाड, चिऊ,काऊ टू पाॅईंट ओ, जैन इंग्लिश स्कूल,तळेगाव दाभाडे.
द्वितीय : वर्षा कुमठेकर, हनुमान,
भैरवनाथ विद्यालय, दोंदे,ता.खेड
रंगमंच रचना
श्रीहरी तनपुरे,
कणकण मे भारत बसता है|
आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे.
अभिनय मुले
प्रथम : वरद पाटील (भू. – विक्रम) ,पहाट, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी
द्वितीय : श्लोक राजेंद्र कालेकर, (भू. – पराग)
सिंहगडाला जेव्हा जाग येते
रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन तळेगाव दाभाडे.
तृतीय : श्रेयस सुभाष महाले.
भू. – बिरसा मुंडा,मुखिया, आदिवासी.
कणकण मे भारत बसता है,
आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे
उत्तेजनार्थ: देवेश देशपांडे
(भू. – पुंडलिक)
डी.आय.सीज.इंग्लिश स्कूल, निगडी
अभिनय मुली
प्रथम : रमणी वैद्य (भू. – रमा)
एकांकिका – भूमिका
डी.आय.सीज.इंग्लिश स्कूल, निगडी
द्वितीय : मनवा वैद्य (भू.- आजी)
विंचू चावला, माऊंट सेंट अँन इं.स्कूल, तळेगाव दाभाडे
तृतीय : अनघा अमोल बेले
(भू. – रेणू), सिंहगडाला जेव्हा जाग येते.
रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन, तळेगाव दाभाडे
उत्तेजनार्थ : काव्या बोरकर,
भू.- किर्तनकार, पहाट ,
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी
उत्तेजनार्थ : आरूषी गणेश माने (भू. – पूर्वा ), आदिम,
सह्याद्री इं.मि.स्कूल, तळेगाव दाभाडे.
लक्षवेधी कलाकार (मुली)
श्रुती निघोजकर (भू. – मंकूची आई), हनुमान ,
भैरवनाथ विद्यालय, दोंदे,ता.खेड






