प्रसिद्ध साहित्यिक गोविंद गोडबोले यांची सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलला भेट

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रसिद्ध बालनाट्य लेखक गोविंद गोडबोले यांची विद्यार्थ्यांसोबत विशेष भेट आयोजित करण्यात आली. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधत वाचन, लेखन आणि सर्जनशीलतेचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात सत्कार आणि पाहुण्यांची ओळख करुन झाली. मुख्याध्यापिका रंजिता थंपी यांनी गोविंद गोडबोले व पत्रकार सुचेता कदम यांचे स्वागत करून त्यांना विद्यार्थ्यांनी बनवलेली भेटवस्तू दिली. यानंतर गोडबोले सरांनी आपल्या लेखनप्रवासातील प्रेरणादायी अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केले.

Advertisement

त्यांनी विद्यार्थ्यांना अधिक वाचा – स्वतः लिहा – कल्पनाशक्ती वाढवा असा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी संयमाने उत्तरे दिली.

ही भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगते व्यक्त करत प्रत्यक्षात लेखकांना भेटल्यानंतर काय भावना येतात त्या उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page