आळंदी इंद्रायणी नदीवरील पुलाचे कामासाठी वाहतुकीत २६ तास बदल पर्यायी मार्गाचा वापर करावा :- मुख्याधिकारी खांडेकर यांचे आवाहन वाहतूक शाखा पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी काढली अधिसूचना

SHARE NOW

आळंदी :

आळंदी नगरपरिषद हद्दीतील इंद्रायणी नदीवर असलेल्या चाकण चौक ते इंद्रायणी नगर कमान दरम्यानच्या पुलावर खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे. या मुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पुलावर तात्काळ डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मुळे पुलाच्या दुरुस्तीसाठी या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजेपासून ते ९ फेब्रुवारी २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिसूचना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय वाहतूक पोलिस शाखा वाहतूक उपायुक्त विवेक पाटील यांनी काढली आहे.

या साठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी वाहतूक पोलीस प्रशासनास प्रस्ताव दिला होता. त्या प्रमाणे वाहन चालकांनी या कामाचे दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस उपायुत वाहतूक शाखा विवेक पाटील आणि आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

या काळात चाकण कडून आळंदी कडे येणारी वाहने आळंदी फाटा किंवा चिंबळी फाटा येथून न येता भारत माता चौक, मोशी, देहू फाटा किंवा भोसरी-मॅगझिन चौक मार्गे वळवण्यात आली आहेत. देहू फाटा आणि इंद्रायणी नगर कमान येथून नवीन पुला कडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून, ही वाहतूक मरकळ चौक, वडगाव चौक किंवा बोपदेव चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल. चाकण चौका कडून येणाऱ्या वाहनांनी धानोरे फाटा किंवा इंद्रायणी हॉस्पिटल चौकाचा वापर करून पर्यायी मार्गाने प्रवास करावा. नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी माहिती फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले असून, वाहन धारकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात वाहतूक नियंत्रण अधिसूचना पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय पोलिस उपायुत वाहतूक शाखा विवेक पाटील आणि आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page