नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NMIET) ला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशन ऑफ द इयर – उद्योग, एसएमई व स्टार्ट-अप्सना पाठबळ व सक्षमीकरण 2026’ पुरस्काराने सन्मानित
तळेगाव दाभाडे : शहरातील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला उद्योग, लघु व मध्यम उद्योग आणि स्टार्ट-अप्सना सक्षम करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाच्या वर्षीचा मनाचा ‘बेस्ट इन्स्टिट्यूशन ऑफ द इयर अवॉर्ड – सपोर्टिंग अँड एम्पॉवरिंग इंडस्ट्रीज, एसएमईज अँड स्टार्ट-अप्स फॉर बेटर ग्रोथ अँड ट्रान्सफॉर्मेशन’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सन्मान कॉर्पोरेट्स, विमा, शिक्षण, एचआर, आयटी तसेच संबंधित क्षेत्रांमध्ये उद्योगसंलग्नता, स्टार्ट-अप इनक्युबेशन, नवोन्मेष आणि कौशल्यविकासासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो.
अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, अभियांत्रिकीचे संचालक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील यांनी महाराष्ट्र बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड्स अॅण्ड रिकग्निशन्स २०२६ या समारंभात पुणे येथे हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन आणि अर्थार्थ वेल्थ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योग, प्रशासन, वित्त आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
नुकताच पद्मश्री मिळालेले डॉ. अशोक खाडे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी आयएएस विकास पानसरे, पी. डी. मालिकनेर, चंद्रकांत साळुंखे, स्मिता भोलाणे, प्रितीश चॅटर्जी, समीर पाटील, आदि उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रमोद पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करताना संस्थेची दृष्टी मांडली. ते म्हणाले, “हा सन्मान आमच्या व्यवस्थापन, प्राध्यापक, विद्यार्थी, उद्योग भागीदार आणि स्टार्ट-अप सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. एनएमआयईटीमध्ये आम्ही केवळ शैक्षणिक मर्यादांपुरते न राहता उद्योगविकास, नवोन्मेष आणि उद्योजकतेला सक्रियपणे चालना देण्यावर भर देतो. संशोधन, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञानाधारित उपायांद्वारे एसएमई आणि स्टार्ट-अप्सना सक्षम करण्याचा आमचा संकल्प या पुरस्कारामुळे अधिक दृढ झाला आहे.”
हा पुरस्कार शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे, उद्योजकीय मानसिकता विकसित करणे आणि क्षमता वृद्धी, संशोधन सहकार्य व नवोन्मेषाधारित उपक्रमांद्वारे एमएसएमईंना पाठबळ देण्यासाठी एनएमआयईटीने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची पावती असल्याचे त्यांनी सांगितले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ चे अध्यक्ष संजय (बाळा )भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव विनायक अभ्यंकर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी एनएमआयईटीच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील संस्थेच्या वाढत्या प्रभावाचे कौतुक केले.






