अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या पहिल्या अकरा अध्यक्षांच्या भाषणाचा संग्रह प्रकाशित होणार : एस.एम.देशमुख

SHARE NOW

मुंबई :

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या पहिल्या अकरा अध्यक्षांनी परिषदेच्या अधिवेशनात केलेल्या भाषणांचा संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय परिषदेने घेतला असून हे काम सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली.

मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3 डिसेंबर 1939 मध्ये झाली.. पहिले अध्यक्ष होते ज्ञानप्रकाशकार काकासाहेब लिमये.. परिषदेचं पहिले अधिवेशन काकासाहेब लिमये यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाले.. संग्रहात त्यांचे भाषण पहिल्या अध्यक्षांचे भाषण समाविष्ट करण्यात आले आहे..

त्यानंतरचे अध्यक्ष न. र. फाटक (पुणे) ज. स. करंदीकर (मुंबई) य. कृ. खाडीलकर (कोल्हापूर) दा. वि. गोखले (सोलापूर) श्री. शं नवरे (नागपूर) त्र्यं. र. देवगिरीकर, (धुळे) ना. रा. बामणगावकर (नाशिक) पा. वा. गाडगीळ (सांगली) आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (बेळगाव) अशा सलग दहा अध्यक्षांच्या भाषणाचा यात संग्रहात समावेश असेल.. 1939 ते 1950 असा हा कालावधी आहे..

याशिवाय 1962 मध्ये अहिलयानगर येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मराठवाडाकार अनंत भालेराव यांनी भूषविले होते.. त्यांच्या भाषणांचा देखील या संग्रहात समावेश करण्यात आला आहे..पुर्वी दरवर्षी परिषदेचं अधिवेशनं व्हायची.. नंतर दर दोन वर्षांनी अधिवेशन होत गेले.. परिषदेचं हे 87 वे वर्ष असून आतापर्यत 43 अधिवेशनं झाली असून 50 अध्यक्ष परिषदेला लाभले आहेत.

Advertisement

 

जानेवारी 1832 मध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे नियतकालिक सुरू करून मराठी पत्रकारितेचा श्रीगणेशा केला.. त्यानंतर पत्रकारांची संघटना स्थापन व्हायला 1939 साल उजाडले.. म्हणजे 107 वर्षानंतर मराठी पत्रकार परिषदेच्या रूपानं पहिली पत्रकार संघटना महाराष्ट्रात सुरू झाली..

परिषदेची स्थापना कशी झाली, कोणाचे योगदान होते मराठी पत्रकार परिषद हे नाव कोणी दिले ही सारी माहिती पत्रकारांसाठी महत्वाची आहे.. ती संपूर्ण माहिती या संग्रहात दिली जाणार आहे.. आतापर्यत परिषदेची अधिवेशनं कुठे झाली, अध्यक्षपद कोणी कोणी भूषविले त्याची माहिती देखील ग्रंथात असणार आहे..

मार्च मध्ये पुस्तक प्रकाशन व्हावे असा प्रयत्न आहे.. एस.एम.देशमुख या ग्रंथाची प्रस्तावना लिहिणार आहेत.. पत्रकारिता कशी विकसित होत गेली इथ पासून पत्रकारितेसमोर कोण कोणते प्रश्न होते आणि आहेत याची माहिती अध्यक्षांच्या भाषणातून कळणार असलयानं हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे..


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page