उपक्रमशील मुख्याध्यापक विजया दांगट सन्मानित

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाच्या वीर जिजामाता शाळेच्या मुख्याध्यापिका विजया दांगट यांनी विद्यार्थ्यांत वृत्तपत्र वाचनआणि पुस्तकवाचन संस्कृतीला रुजविण्याबरोबरच त्यांच्या उपजत गुणांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविल्याबद्दल पत्रकार दिनी त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

 

शालेय जीवनापासून मुलामुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास भाषा ज्ञानातून व्हावा म्हणून मराठी आणि इंग्रजी बोली भाषांच्या वर्गात त्या प्रोत्साहन देत आहेत. नगर परिषद आणि शिक्षण मंडळाने यंदापासून सुरू केलेले मराठी इंग्रजी बोली भाषा अध्ययन उपक्रम, महान व्यक्तींचे विशेष दिन तसेच इतर सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून नगर परिषदेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. द रॉयलएज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्ष याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रशिक्षण केंद्र यशदाचे मास्टर ट्रेनर व व्याख्याते विवेक गुरव आदींनी मुख्याध्यापक विजया दांगट आणि त्यांच्या सहशिक्षकांचे अभिनंदन केले आहे. प्रेस फाउंडेशनतर्फे दांगट यांना शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.

Advertisement

फाउंडेशन अध्यक्ष विलास भेगडे, प्रकल्प प्रमुख डॉ. संदीप गाडेकर, अंकुश दाभाडे,रेखा भेगडे, महेश भागीवंत, मयूर सातपुते, शिक्षक सागर सांगळे आणि ए.ए. खान यावेळी उपस्थित होते.

 

चौकट : वृत्तपत्राच्या शालेय वाचन उपक्रमात नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळा अग्रेसर आहेत. साप्ताहिक वाचन आणि अवलोकन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सुरू असते. यामुळे वृत्तपत्र वाचन करण्याची सवय बाळगली जाईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page