इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा लोणावळ्यामध्ये गौरव. 

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या नाट्य विभागाची विद्यार्थिनी कु. सृष्टी बोचरे हिने लोणावळा येथील व्ही.पी.एस. हायस्कूल आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

साठ हून अधिक स्पर्धकांमधून सृष्टी बोचरे हिची या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली.

‘ देशाची शान, स्त्रीचा सन्मान!’ या विषयावर बोलताना, सृष्टी हिने स्त्रियांची जगभरातील कामगिरी, स्त्रियांसमोरील आव्हाने, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातील स्त्रियांचा प्रवेश आणि देशाच्या उभारणीतील स्त्रियांचे योगदान, आदी मुद्द्यांची अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. तिच्या आत्मविश्वासपूर्वक सादरीकरणाने प्रेक्षकांसोबतच परीक्षकांचीही मने जिंकली.

तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या नाट्य विभागाची विद्यार्थिनी असलेली सृष्टी हिला या स्पर्धेसाठी साठी प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे सर, उपप्राचार्य श्री. एस. पी. भोसले सर, नाट्य विभागाचे प्रा. आर.आर. डोके, प्रा. क्षिप्रसाधन भरड तसेच प्रा. पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement

अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी इंद्रायणी महाविद्यालय कटीबद्ध असून, विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभागी होत स्वतःमधील आत्मविश्वास वाढवावा, तसेच वाचन, चिंतन, मनन आणि श्रवण वृद्धिंगत व्हावे, यासाठी इंद्रायणी महाविद्यालयाचे सर्वच शिक्षक वृंद कायमच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असतात.

इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असलेली सृष्टी बोचरे हिने अभ्यासातील प्रगती सांभाळत मिळवलेल्या या यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रामदासजी काकडे साहेब, कार्यवाह मा. श्री. शेटे साहेब व खजिनदार मा. सौ. निरुपाजी कानिटकर यांनी कौतुक करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पदाधिकारी सदैव तत्पर असल्याची खात्री दिली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page