चोरी व हरवलेले ७० मोबाईल मालकांच्या हाती देहूरोड पोलिसांनी परत केले
देहूरोड :
देहूरोड पोलिसांनी एक प्रशंसनीय उपक्रम राबवत, नागरिकांचे हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून त्यांच्या मालकांना परत केले आहेत.बुधवार ( ता.१२ ) रोजी सायंकाळी ५ वाजता देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते सत्तर पैकी छत्तीस मोबाईल धारकांचे मोबाईल परत हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले.
चिंचवड पोलिस आयुक्तालय , पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्य पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पुढाकाराने सहायक पोलिस निरीक्षक अक्षय जाधव ,पोलीस कॉन्स्टेबल ऐश्वर्या राऊत , मयूर घागरे यांनी ही कामगिरी केली.
*देहूरोड पोलिस स्टेशन हद्दीत अनेक मोबाईल चोरी व हरवले असले बाबत पोलिस स्टेशन मध्ये तक्रारी दाखल झाल्या होत्या. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या सीईआयआर या विशेष वेब पोर्टलवर हरवलेल्या मोबाईलची नोंद करण्यात आल्यानंतर, पोलिसांनी त्याचा तांत्रिक तपास सुरू केला.
या तपासात ,कर्नाटक , उत्तर प्रदेश , बिहार ,आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून दोन ते अडीच महिन्यात ७० मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
*राज्य शासनाने एक सीईआयआर पोर्टल सुरू केले आहे.ज्यांचे मोबाईल हरवले किंव्हा चोरीला गेले असतील आशा मोबाईल धारकांनी या वरील वेब पोर्टलवर जाऊन स्टार हॅश ,०६ हॅश टाकला की आपल्या मोबाईलचा आयएमईआय नंबर मिळतो ,त्यावरून आपल्या मोबाईलचा शोध घेऊ शकता. *विक्रम बनसोडे ,वरिष्ठ पोलिस निरीक्षक देहूरोड पोलिस ठाणे
हरवलेला मोबाईल म्हणजे अनेकांसाठी केवळ एक साधन नसून, त्यात असतात आठवणी, महत्वाची माहिती आणि भावनिक मूल्य.
अशा हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन नागरिकांना दिलासा देणारे देहूरोड पोलिसांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.






