पूरग्रस्तांसाठी डाॅ लीना कवितके यांचा मदतीचा हात
देहू: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अशा संकटाच्या क्षणी मदतीसाठी धावून जाण्याचे कार्य तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास असणाऱ्या डाॅ लीना नारायण कवितके आणि इनरव्हिल क्लब हाती घेतले आहे.
पूरग्रस्त बांधवांसाठी जीवनावश्यक साहित्याचे व वैद्यकीय साहित्याचे किट तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी श्री क्षेत्र देहू येथे पाठविण्यात आले असून तेथून ते सर्व जीवनावश्यक साहित्य सोलापूर व बीड जिल्ह्यात रवाना करण्यात आल्याची माहिती डाॅ लीना कवितके यांनी दिली आहे.
या अगोदर देखील डाॅ लीना यांनी कोरोना महामारी मध्ये हजारो नागरिकांना N95 रेस्पिरेटर फेस मास्कचे मोफत वाटप केले आहे तसेच दरवर्षी त्या हजारो वृक्षांची रोपे मोफत वाटप करतात.
त्यासंदर्भात बोलताना डाॅ लिना कवितके म्हणाल्या की संकटाच्या काळात एकमेकांना साथ देणे हीच खरी माणुसकी आहे. पूरग्रस्तांना मदत करणे ही सर्वांचीच सामाजिक जबाबदारी आहे.






