ह भ प संतोष कुंभार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील सांप्रदायिक क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तिमत्व ह भ प संतोष कुंभार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संतश्रेष्ठ गोरोबाकाका पायी पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष- ह.भ.प.संतोष कुंभार यांना सोलापूर येथील सिद्धरामेश्वर मंदिराशेजारील निर्मलकुमार फडकुले सभागृह या ठिकाणी मान्यवरांचे हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी भगवान कुंभार, सखाराम कुंभार, रामचंद्र हाडशीकर,संतोष गा.कुंभार, प्रभाकर छत्तीसकर,दत्तात्रय कोथुर्णेकर,गोपीचंद महाराज कचरे,असवले महाराज,मकरंद कुंभार, आण्णा काळे महाराज, माजी सभापती सुवर्णाताई कुंभार, कोमल कुंभार, पूनम कुंभार इत्यादी समाज-बांधव उपस्थित होते ह भ प संतोष कुंभार यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे





