बालविकास विद्यालयत 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे.

स्नेहवर्धक मंडळ सोशल एज्युकेशनल ट्रस्टच्या बालविकास विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. विद्यालयाचे माजी विद्यार्थी लेफ्टनंट कर्नल श्री ऋषिकेश खांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

श्री ऋषिकेश खांडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यात शिस्त आणि आरोग्य हे महत्त्वाचे आहे. हे सांगितले .

यवर्षी विद्यालयातील सजावट संकल्पना” मिशन सिंदूर “यावर आधारित होती.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .नूतन कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे परिचय व स्वागत करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisement

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत शेटे ,उपाध्यक्ष श्री सुभाष खळदे ,सचिव श्री किशोर राजेश खजिनदार श्री सुनील कडोलकर , श्री सुरेश चौधरी, श्री अशोक काळोखे, श्री शिवाजी आगळे, इतर संस्थेचे मान्यवर सभासद, मुख्याध्यापिका सौ नूतन कांबळे ,प्राचार्य डॉ पल्लवी वर्तक ,ऑफिस अध्यक्ष सौ सुजाता कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री दीपक खटावकर श्री सागर केंजूर, सौ वंदना भोळे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व पालक हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी कु. रमा देशपांडे हिने केले चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page