वडगाव मावळ मध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न सुमारे ३ हजार महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

SHARE NOW

वडगाव मावळ (ता. मावळ) येथे हिरकणी महिला मंच व सौ राणीताई म्हाळसकर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम ५ ऑगस्ट २०२५ रोजी विशाल लॉन्स येथे पार पडला. या कार्यक्रमाला गावातील विविध भागांतून सुमारे ३,००० महिलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या ठिकाणी खेळ, उखाणे, डान्स, गीतं, पारंपरिक झिम्मा, फॅशन शो अशा अनेक पारंपरिक व मनोरंजनात्मक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत संपूर्ण वातावरण उत्साहात न्हाऊन गेले. लहान मुलांसाठी देखील खास बालजत्रेचे आयोजन करण्यात आले.

एकूण आठ गटांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये

मध्ये विजयी ठरलेले गट पुढीलप्रमाने आहेत.

प्रथम क्रमांक – “घे भरारी”

द्वितीय क्रमांक – रणरागिनी

तृतीय क्रमांक – “जिजाऊंच्या लेकी”

चौथा क्रमांक – “स्त्री शक्ती”

पाचवा क्रमांक – “श्री स्वामी समर्थ”

Advertisement

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, तसेच मा. राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांच्या सुविज्ञ पत्नी सारिकाताई भेगडे, भाजपा चे प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर, मावळचे पंचायत समिती सभापती गुलाबकाका म्हाळस्कर, संभाजी म्हाळसकर, मंगेश काका ढोरे, रवींद्र माळसकर, सचिन कराळे, गणेश गवारे, नवनाथ मालपोटे,तसेच सुनिताताई भिलारे, शोभाताई भेगडे ,रजनीताई ठाकूर, नीलिमाताई दाभाडे, सविताताई गावडे, संजनाताई सातकर,ज्योतीताई काटकर, सीमाताई देशमुख ,मीनाताई माळी, सुवर्णाताई घोटकुले, शहर युवा अध्यक्ष आतिश ढोरे युवराज म्हाळसकर अमोल ठोंबरे. नितीन ओव्हाळ,महेश निकम,तसेच मनस्विनी महिला मंचाच्या सर्व सभासद उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेलिब्रिटी अँकर आर.जे.अक्षय यांनी केले.सुत्र संचालन रोहिणी भोर यांनी केले व आभार राणीताई जमदाडे यांनी मानले

वडगाव मावळच्या इतिहासात पहिल्यांदाच असा हा आगळावेगळा आणि भव्य दिव्य असा मंगळागौरीचा सोहळा पार पडला


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page