शिवसेना मावळ चा बंद जलवाहिनी ला विरोध कायम
मावळ :
९ ऑगस्ट २०११ रोजी हक्काच्या पाण्यासाठी द्रुतगती महामार्गावर झालेल्या आंदोलनात शहीद झालेल्या तीन शेतकरी बांधवांना शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ही योजना कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने आज करण्यात आली शिवसेना कालही शेतकऱ्यांच्या सोबत होती आजही शेतकऱ्यांच्या सोबत आहे आणि उद्या ही शेतकऱ्यांच्या सोबत राहणार आहे तसेच जे जखमी शेतकरी आहेत त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे धरणग्रस्त यांना तात्काळ पर्याय जमिनीचे वाटप करावे सातबारा वरील बंद जलवाहिनी शेरा रद्द करावा तसेच पवना धरणाचे लाभ क्षेत्र असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रकल्पग्रस्तांच्या कोठा वाढविण्यात यावा व पवना नदी सुदार प्रकल्प अंतर्गत पवना नदी पावना धरण ते पिंपरी चिंचवड शहरापर्यंत नदी सुधार कार्यक्रम राबवावा तसेच ज्या ठिकाणी पाहुणा नदी प्रदूषित होते अशा केमिकल कंपन्यांवरती कारवाई करून त्या बंद कराव्यात शिवसेना शेतकऱ्यांच्या सोबत राहणार आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख शरदराव हुडावळे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर युवासेना जिल्हा अधिकारी विशाल हुलावले तालुका युवासेना अधिकारी राजेश वाघोले तालुका संघटक अमित कुंभार मदन शेडगे चंद्रकांत जी होते तालुका उपप्रमुख रामभाऊ सावंत चंद्रकांतभोते, धनंजय नवघणे अंकुश आखाडे राहुल जवेरी जयदीप कुंभार अल्ताफ शेख आणि जवेरी मुकुंद ठाकर आदी उपस्थित होते






