अॅड. अभिजीत जांभुळकर यांची मावळ तालुका अध्यक्षपदी निवड

SHARE NOW

तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनच्या मावळ तालुका अध्यक्षपदी ॲड. अभिजीत जांभुळकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली.

Advertisement

ॲड. अभिजीत जांभुळकर हे गेली १८ वर्षे विधी व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक व कायदाक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन राज्य अध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष ॲड. यशवंत खराडे, सचिव ॲड. प्रवीण नलावडे तसेच प्रवक्ता ॲड. अतिश लांडगे यांनी नियुक्ती केली व त्यांची ही निवड झाली आहे. सदर नियुक्ती प्रमाणपत्र महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आमदार .अण्णा बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी ॲड. दिनकर बारणे, प्रदेश सदस्य ॲड. शंकरराव वानखेडे, प्रदेश प्रवक्ता,ॲड. वैभव कर्वे अध्यक्ष खेड वकील संघटना, ज्येष्ठविधीज्ञ अँड मयूर लोढा, ॲड. सचिन नवले, ॲड. गणेश जगताप, ॲड. प्रताप मेरुकर, ॲड. योगेश थंबा,ॲड. गुरुप्रसाद शिवलकर, ॲड. तेजस्विनी परमाने पवार हे उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page