तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांवर लादलेला वाढीव कर, तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा म्हणून तळेगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन दिले
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांवर लादलेल्या वाढीव कर रद्द करावा व तळेगांव दाभाडे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा असे निवेदन तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तळेगांव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड यांना निवेदन दिले व लवकरात लवकर निर्णय घेऊन तळेगांव दाभाडे शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तळेगांव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आला.
यावेळी तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशोक दाभाडे, माजी नगरसेवक सचिन टकले, शोभा भेगडे, सरचिटणीस स्वप्निल भेगडे, तनुजा दाभाडे,निर्मल ओसवाल,माजी कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, कोषाध्यक्ष विनायक भेगडे,उपाध्यक्ष सतिश पारगे, मुदुला भावे,सचिव संध्या जाधव,रूपेश गायकवाड,तळेगांव दाभाडे स्टेशन विभाग महिला मोर्चाच्या अध्यक्षा निर्मला पोटे,युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरव गुंड,ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नितीन पोटे,जेष्ठ कार्यकर्ता आघाडीचे अध्यक्ष अनिल वेदपाठक,सुधाकर घनशेट्टी,ओबीसी युवा मोर्चाचे अध्यक्ष आशुतोष हेद्रे, सोशल मीडियाचे अध्यक्ष ऋषिकेश सुतार,समीर भेगडे, विद्यार्थी आघाडीचे रोहन जाधव, विशाल जव्हेरी, उपस्थित होते.
यावेळी सर्व अडचणी ऐकून घेत योग्यती उपाययोजना करून प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.






