लायन्स क्लब तळेगाव आणि रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन मुंबई पुणे हम रस्त्यावर वृक्षारोपणाने संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

दिनांक पाच जून 2024 रोजी मुंबई पुणे हम रस्त्यावरील टोलनाक्यापासून लडकत पेट्रोल पंपापर्यंत आणि डाव्या बाजूस इंद्रायणी ढाब्यापासून ते बेगडेवाडी रेल्वे रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत *100 वृक्ष* लागवड करण्यात आली! हा प्रकल्प संपन्न होण्यासाठी डिस्ट्रिक्टच्या रोड सेफ्टीच्या लायन मंदाकिनी माळवदे यांनी खरोखरच विशेष परिश्रम घेतले.त्यांना त्यांच्या पुना गॅलेक्सी क्लबच्या लायन मीना सासने यांनीही खूप मदत केली. लायन्स क्लब तळेगावचे विद्यमान कर्मयोगी अध्यक्ष डॉक्टर अनिकेत काळोखे यांनी वृक्ष लागवडीसाठी लागणारे संपूर्ण सेंद्रियखत उपलब्ध करून दिले.!ज्येष्ठ लायन डॉक्टर शालिग्राम भंडारींनी उपस्थितांना आपल्या मनोगतात तळेगाव लायन्स क्लबच्या प्रगतीचा आलेख सादर केला व या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.तळेगाव लायन्स क्लबचे ला भरत पोतदार- लायन प्रमिला वाळुंज,इनकमिंग प्रेसिडेंट लायन अनिल तानकर, सेक्रेटरी लायन सुचेत्रा लायन शेखर चौधरी, लायन प्रियंका काळोखे, लायन डॉक्टर केतन ओसवाल हे सर्व क्रियाशील सदस्य उपस्थित होते म्हणूनच मुंबई पुणे हायवे वरील 100 वृक्ष लागवडीचा हा भरगच्च मन प्रसन्न करणारा पवित्र समारंभ शंभर टक्के यशस्वी झाला. या वृक्षारोपणाच्या निमित्ताने- पर्यावरण संदर्भातील आपल्या कर्तव्याची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला व्हावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेने हा उपक्रम हाती घेतलेला आहे.संघटनेचा हाच उद्देश 100% यशस्वी होईल यात तिळमात्र शंका नाही. या विचाराने उपस्थित लायन्स सभासदांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तृप्तीच समाधान झळकत होतं.आभार प्रदर्शनानंतर या समारंभाची सांगता सुग्रास भोजनाने झाली!


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page