तळेगाव दाभाडे येथे सामुदायिक अग्निहोत्र संपन्न!

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे कातवी येथील अग्निहोत्र हाऊस (मंदिर ) मध्ये परमसद्गुरु श्रीगजाननमहाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त सायंकाळी सामुदायिक भव्य अग्निहोत्र संपन्न झाले.

Advertisement

यावेळी जोरदार पाऊस असूनही अनेक नागरिकांनी अग्निहोत्र प्रत्यक्ष स्वतः करून समजून घेण्यासाठी हजेरी लावली. अग्निहोत्र झाल्यावर अनेक नागरिकांनी आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ अग्निहोत्र प्रचारक जयवंत पवार यांनी अक्कलकोटची दिव्य गुरुपरंपरा, श्री स्वामी समर्थ महाराज द्वारा स्थापित दिव्य गुरु पिठावरील परमसद्गुरु श्रीगजाननमहाराज (शिवपुरी – अक्कलकोट) यांच्या दिव्य जीवनाविषयी आणि त्यांनी सर्व जगाला दिलेला दिव्य संदेश म्हणजेच अग्निहोत्र विषयी माहिती दिली. आभार अॅड. जी.एस. निकाळे यांनी मानले. त्याचबरोबर शिवपुरी अक्कलकोट येथे येण्याचे आमंत्रण दिले. कार्यक्रमाचे आयोजन वडगाव नगरीचे माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण यांनी केले होते. त्याचबरोबर रात्री १२ वाजून ४२ मिनिटांनी “श्री” जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

यावेळी विश्व फाउंडेशन (शिवपुरी अक्कलकोट) चे सर्व अग्निहोत्र प्रशिक्षक, आचरणकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page