इंद्रायणी विद्या मंदिर संचलित कांतीलाल शाह विद्यालय रौप्य महोत्सवानिमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा हा नाट्य प्रयोग.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संचलित कांतीलाल शाह विद्यालयास पंचवीस वर्षे पूर्ण होत आहे. मावळ तालुक्यातील एक अग्रगण्य विद्यालय म्हणून या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाची ओळख आहे. ज्ञानामधील गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते. शिक्षण हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला यशाकडे घेऊन जाते या उक्तीप्रमाणे शाळेमध्ये केवळ शैक्षणिक नाहीतर सामाजिक सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसाही तेवढ्याच उत्साहाने जपला जातो.

त्यामुळेच यावर्षी गुरुवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता या दिवशी शाळेने वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये जाणता राजा हे नाट्य सादर करण्याचे ठरविले आहे. स्वराज्याचा सुवर्णकाळ ज्यांनी दाखवला त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा ऐकताना आजही आपलं रक्त सळसळते. या जाणता राजाच्या चरित्राचे सतत मनन चिंतन व्हायला हवं. महाराजांच्या चरित्रातून तरुण पिढीला घेण्यासारखं खूप काही आहे. या चरित्राच्या माध्यमातून देशाचे भावी आधारस्तंभ कणखर आणि सक्षम बनतील याच विचाराने प्रेरित होऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा हे नाट्य बसवण्याचा निर्णय झाला.

Advertisement

हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी संस्थेचे आधारस्तंभ कृष्णरावजी भेगडे साहेब, संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे, उपाध्यक्ष गोरखभाऊ काळोखे, उपाध्यक्ष डॉ. दीपक शहा, खजिनदार शैलेश शाह ,कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे सदस्य संजय साने, निरुपा कानिटकर, गणेश खांडगे, युवराज काकडे, संदीप काकडे, विलास काळोखे, रणजीत काकडे, परेश पारेख तसेच कांतीलाल शहा विद्यालयाच्या व्यवस्थापिका अर्चना चव्हाण, मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी , उपमुख्याध्यापिका वैशाली शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सारिका तितर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

तरी सर्वांनी गुरुवार दिनांक २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, इंद्रायणी विद्या मंदिर प्रांगणात जाणता राजा हे महानाट्य पाहण्यास येऊन कांतीलाल शाह विद्यालय या ज्ञान मंदिरास पंचवीस वर्षे पूर्ण होत आहे या आनंदात सहभागी व्हावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page