वीर जिजामाता प्राथमिक शाळा क्र. ५ मध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे,

 

दि. १५ जून २०२६ : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी वीर जिजामाता प्राथमिक शाळा क्र. ५, तळेगाव दाभाडे येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांबरोबर उपस्थित पालकांचेही स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र शासनातर्फे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.

शाळेच्या प्रथम दिवशी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शिक्षण सभापती सौ.भारती सुरेश धोत्रे , नगरसेविका सौ.सुरेखा निलेश भेगडे,

नगरसेविका सौ.ऋतुजा कल्पेश भगत

यांनी शाळेस भेट देवून विद्यार्थी व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisement

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासन अधिकारी श्रीम. अनिता वैद्य मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सुरेखा मोहन केदारी उपस्थित होत्या.

 

 

विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समितीचे सदस्य श्री. रामभाऊ गाढेकर यांच्या वतीने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही आनंदाने कार्यक्रमात सहभाग घेतला.

 

या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ विजया दांगट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी केले. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळा प्रवेशोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page