नदीत पडलेल्या महिलेचा धाडसी बचाव; माणिक जाधव यांचे सर्वत्र कौतुक..
देहू प्रतिनिधी दिनांक 16 आज सकाळी सहा वाजता इंद्रायणी नदी मध्ये एका महिलेने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या काही युवकांनी त्या महिलेला पाण्यामध्ये जलपर्णी वरती तरंगताना पाहिले व सामाजिक कार्यकर्ते माणिक जाधव यांना फोन केला,त्यावेळेस माणिक जाधव यांनी कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.. अडीच तासाच्या अथक प्रयत्ना नंतर महिलेला पाण्यातून बाहेर काढण्यास यश आले.. या कामासाठी एन डी आर फ ,देहूरोड पोलीस स्टेशन यांची खूप मोलाची मदत झाली असल्याचे जाधव सांगतात..आता सध्या ती महिला वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून तिची तब्येत व्यवस्थित आहे.या महीलेला वाचवण्यात संदिप सगडे यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले तसे ,हनुमंत खाडे ,बळीराम लोकरे यांनी जिवाची पर्वा न करता महीलेस वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.माणिक जाधव यांच्या धाडसचे कौतुक करताना,
महिला काँग्रेस समन्व्यक अध्यक्षा वनिताताई देशकर यांनी सांगितले की, माणिक जाधव हे पूर्वी पासूनच नदीत डुबणारे ह्यांना वाचवणारे माणसातील देव माणूस आहेत.. तर देहू शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश मुसूडगे यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या वतीने माणिक जाधव यांचा सा हसाचा धाडसी वृतीचा सत्कार करणार आहोत, इंद्रायणी नदीपात्रात पडलेल्या महिलेचा जीव धोक्यात असताना माणिक जाधव ह्या धाडसी व्यक्तीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेत तिचे प्राण वाचवले. या धाडसी कृतीमुळे उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी सरपंच मधुकर कंद पाटील यांनी सांगितले की, या माणिक जाधव च्या धाडसी कार्य मुळे स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेब यांनी, जाधवलाचे कौतुक करून,तात्काळ नोकरी दिली..कंद पाटील पुढे म्हणाले माणिक जाधवच्या धाडसची दखल महाराष्ट्र सरकारने घेऊन, त्याचा गौरव करावा, या साठी सर्व देहूकर शासनाकडे मागणी करणार आहे..
विशेष म्हणजे, माणिक जाधव ह्यांनी यापूर्वीही नदीत बुडणाऱ्या अनेकांना सुरक्षित बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले आहेत. संकटसमयी तत्परतेने मदतीला धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
त्यांच्या धाडसामुळे एका महिलेला नवजीवन मिळाले असून, मानवतेचे जिवंत उदाहरण जाधव यांनी समाजासमोर ठेवले आहे..






