प्रवेशासाठी रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही महाविद्यालय सुरु राहणार – श्री. रामदास काकडे
तळेगाव दाभाडे :
विद्यार्थी हिताला प्राधान्य देत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात सर्व विद्या शाखा रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशीही प्रवेश प्रक्रियेसाठी सुरू राहतील, असे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे यांनी सांगितले.
इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी फेरीनिहाय प्रवेश देण्याची प्रक्रिया मागील आठवड्यापासून सुरू झाली. पहिल्या फेरीचे प्रवेश एक आठवड्यापूर्वी संपले आहेत. १३ जून रोजी सकाळी ९.३० ते ५.३० वाजता दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. १४ जूनला रविवारी सुट्टी असली तरी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया नियमित सुरू राहील. दुसऱ्या फेरीचे प्रवेश १३ ते १६ जून दरम्यान दिले जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांनी सांगितले. प्रवेशाची दुसरी फेरी १३ ते १६ जून दरम्यान सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
त्याचबरोबर वरिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान, कॉम्प्युटर सायन्स, बीबीए, बीसीए, एमबीए ,एमसीए, एम ए, एम कॉम., पत्रकारिता या सर्व विभागाचे प्रवेश रविवारी सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतील. तसेच यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील प्रवेश आणि कृष्णराव भेगडे फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, बी फार्मसी आणि डी फार्मसी, एम फार्मसी या विभागाचे प्रवेश देखील रविवारी सुरू राहतील असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे . विद्यार्थी व पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून सदरचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी वेळेमध्ये आपली प्रवेश प्रक्रिया करून घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.






