पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या (12वर्षे )तपपुर्व कार्याचा अहवाल भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेच्या शेवटच्या घटका पर्यंत पोहचावावा-मा. राज्यमंत्री बाळा भेगडे

SHARE NOW

वडगाव (मावळ)

भारतीय जनता पार्टी मावळ तालुका प्रमुख पदाधिकारी यांची बैठक वडगाव भाजपा पक्ष कार्यालयात संपंन्न झाली, यावेळी मा. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मोदी सरकारची बारा वर्षे (4440 दिवसांचा )कार्याचा अहवाल हा भाजपा कार्यकर्त्यांना एक नवसंजीवनी व प्रेरणा देणारा असुन तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपापले भागात काम करत असताना जनतेच्या शेवटच्या घटका पर्यंत अनेक योजनांचा फायदा नागरिकांना घेऊन द्यावा व सर्व सामान्य जनतेची कामे करावी असा संदेश दिला

Advertisement

तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, महिला भगिनी यांची सरकारी दप्तरी रखडलेली कामे मार्गी लावणेसाठी महिन्यातून एक दिवस भाजपा पक्ष कार्यालय या ठिकाणी ते स्वता उपस्थित राहुन जनता दरबार चे माध्यमातून हे काम करणार आहे असे आश्वासन दिले.

यावेळी प्रदेश भाजपा किसान मोर्चा चे मा. अध्यक्ष गणेश भेगडे, मा जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, रामदास गाडे, दत्तात्रय माळी,प्रशांत भागवत,रघुवीर शेलार,किरण राक्षे,बाळासाहेब घोटकुले, अनिल गायकवाड, संभाजी म्हाळसकर, अभिमन्यु शिंदे, गणेश ठाकर आदिसह सर्व मंडळ व ग्रामीण चे अध्यक्ष, प्रभारी,पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतें


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page