पाच राज्यातील निवडणुकांबाबत खासदार सुळे यांचे मोठे वक्तव्य…

SHARE NOW

पाच राज्यातील निवडणुकांबाबत खासदार सुळे यांचे मोठे वक्तव्य…

सत्तेच्या ऑफरबाबत खासदार सुळे यांचा खुलासा

बारामती : सध्या पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या बाजूने लोकांचा कल असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले खासदार सुळे आज बारामती दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत वरील दावा केला.

पुढे बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की या राज्यातील लोक हुकूमशाही महागाई बेरोजगारी याचा विरोधात मतदान करत आहेत या निवडणुकांमध्ये काँग्रेस पुढे असल्याचे दिसून येत आहे काँग्रेसने जनतेला महागाई बेरोजगारीचा विरोधात लढू असे आश्वासन दिले आहे आणि यावर जनतेनेही विश्वास टाकला आहे.

Advertisement

खासदार सुप्रिया सुळे या आपल्या भाषणामध्ये नेहमीच सत्ता आणि संघर्ष हे दोन पर्याय आपल्यासमोर होते त्यापैकी मी संघर्ष हा पर्याय निवडला. भाजप सोबत तुम्ही गेला असता तर तुम्हाला मंत्रीपदाची ऑफर होती याबाबत प्रश्न विचारला असता सुळे म्हणाल्या की माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले आहेत आणि मी एक महिला आहे सगळ्याच गोष्टी बोलल्या पाहिजेत असा आग्रह कशासाठी महिलांना काही गोष्टी पोटात ठेवण्याची महिलांना सवय असते याला मराठीत बाईपणा म्हणतात हे संस्कार मला आईकडून मिळाले आहेत असे उत्तर खासदार सुळे यांनी दिले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दंगली बाबत वक्तव्य केले आहे या वक्त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रकाश आंबेडकरांना अटक करा अशी मागणी केली आहे या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की राणे हे या देशाचे मोठे नेते आहेत शिवाय राज्यात आणि देशातही ते सत्तेवर आहेत त्यामुळे ते जे काही बोलले असतील ते कॅबिनेट मध्ये बोलतील किंवा त्यांच्या गृहमंत्र्यांना सांगतील असे उत्तर खासदार सुळे यांनी दिले


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page