“गीता बोले मनाशी” उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे वाटप

SHARE NOW

लोणावळा | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजन्ड्सने “गिता बोले मनाशी – विद्यार्थी काळातील संवाद” या विशेष उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाअंतर्गत भगवद्गीतेच्या २००० प्रती लोणावळ्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आल्या.

भगवद्गीता ही केवळ धार्मिक ग्रंथ न राहता, ती एक आचारधर्म, नैतिकता, आत्मज्ञान आणि कर्तव्यबुद्धीचे मार्गदर्शन करणारी अमूल्य रचना आहे. विशेषतः आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी गीतेतील तत्त्वज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हे ओळखून, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, चारित्र्यनिर्मिती आणि मनोबल वृद्धिंगत व्हावे या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमात सहभागी झालेल्या शाळा पुढीलप्रमाणे:

Advertisement

ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल

गुरुकुल हायस्कूल

व्हि.पी.एस. हायस्कूल

डॉ. बी. एन. पुरंदरे हायस्कूल

सिंहगड हायस्कूल

या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजन्ड्सचे सचिव लायन मिनाक्षी गायकवाड, कोषाध्यक्ष लायन नुतन घाणेकर, प्रोजेक्ट इनचार्ज लायन किर्ती आगरवाल आणि लायन सुरेश गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमासाठी लायन उमा मेहता, लायन एम जे एफ राजेश मेहता, लायन विजय रसाळ, लायन विवेक घाणेकर, लायन आय.पी.पी. गोरख चौधरी, लायन धनंजय साखरेकर, लायन मनोज कदम, आणि लायन उदय पाटील यांची उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेच्या या प्रत स्विकारताना आनंद व्यक्त केला असून, गीतेतील तत्त्वज्ञान अभ्यासून त्यांचे आत्मिक व बौद्धिक उन्नयन होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page