तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

दि.१८.पुणे जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुकास्तरीय कराटे स्पर्धा रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाली या स्पर्धेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील कुमारी यशोदा हेंद्रे हिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळावला आहे. तसेच संयम गाडे याने देखील प्रथम पटकावत सुवर्ण पदक मिळावला आहे.

Advertisement

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे समन्वयक संदिप काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे उपप्राचार्य प्रा.संदिप भोसले सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सदर स्पर्धा सिद्धांत कॉलेज सुदुंबरे या ठिकाणी संपन्न झाला.यावेळी क्रीडा विभाग प्रमुख योगेश घोडके मार्गदर्शक गोरख काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page