तळेगावात भर दिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची धारदार शस्त्राने वार करत हत्या.
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहरात शुक्रवारी दिनांक 31 रोजी भर दिवसा गर्दीच्या ठिकाणी एका 19 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. या घटनेने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भर दिवसा घडलेल्या घटनेने शहराचा कायदे विषयक प्रश्न पुन्हा एकदा ऐरनिवर आला आहे.
तळेगाव स्टेशन भागातील सिद्धार्थ नगर येथे ही घटना घडली प्राथमिक माहितीनुसार आर्यन बेडेकर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शनी नी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी युवकावर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली व तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाचा मृतदेह शवाविच्छेदनासाठी पाठवला आहे पुढील कारवाई सुरू आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.