सरस्वती विद्यामंदिर मध्ये डिजिटल बोर्ड उद्घाटन समारंभ उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे :
सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील शाळेत महिंद्रा एक्सेलो कंपनी कान्हे तर्फे 20 डिजिटल बोर्ड, सॅनिटरी नॅपकिन मशीन व वेंडिंग मशीन सी एस आर फंडातून देण्यात आली. शुक्रवार दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी आयोजित केलेल्या उद्घाटन समारंभात महिंद्रा एक्सल एक्सेले कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर नोरा भाटिया, प्लांट चीफ ऑफिसर लक्ष्मण महाले, प्रोजेक्ट अँड मेंटेनन्स चे मुख्य श्री लक्ष्मण पोपलघट, प्लांट हेड श्री निवास गंधाले, प्लांट दोन चे मुख्य श्री सुहास निसाळ, इंडस्ट्रियल रिलेशन चे मुख्य श्री दादाराम मेहेत्रे ,सीएसआर विभागाचे मुख्य व कमर्शियल विभागाचे सहाय्यक मॅनेजर श्री अभिजीत जाधव त्याचप्रमाणे त्यांचे बारा सहकारी उपस्थित होते. सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश झेंड,उपाध्यक्ष श्री दिलीप कुलकर्णी, कार्यवाह श्री प्रमोद देशक खजिनदार सौ सुचित्राताई चौधरी शिक्षण मंडळ सदस्य डॉक्टर ज्योतीताई चोळकर ,सदस्य श्री सुनील आगळे, श्री विश्वास देशपांडे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ रेखा परदेशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री नवनाथ गाढवे, इंदोरी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री नितीन शिंदे ,बालवाडी तळेगाव विभाग प्रमुख सौ सोनाली काशीद, बालवाडी इंदोरी विभाग प्रमुख सौ अनुराधा बेळणेकर या समारंभास उपस्थित होते .प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डिजिटल बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉक्टर नोरा भाटिया मॅडम व श्री लक्ष्मण महाले सर यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्ड वापरा संदर्भात व त्याच्या उपयुक्ततेबद्दल माहिती विचारली. काही विद्यार्थ्यांनी डिजिटल बोर्ड चालू करून दाखवला त्याबद्दल त्यांनी कौतुक केले .महिंद्रा एक्सले कंपनीतर्फे पर्यावरण ,शिक्षण, महिला यासाठी सीएसआर फंडातून मदत केली जाते व मला विद्यार्थ्यांसाठी मदत करण्यास आवडेल असे मत डॉक्टर भाटिया यांनी मांडले .तर श्री लक्ष्मण महाले सरांनी विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्ड संदर्भात पुन्हा भेट देण्याचे आश्वासन दिले .श्री निवास गंधाले सर यांनी शाळेसाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तूची मदत कंपनी नक्की करेल असे सांगितले .संस्थेतर्फे उपाध्यक्ष श्री दिलीप कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात महिंद्रा एक्सले तर्फे मिळालेल्या डिजिटल बोर्डाचा शिक्षक व विद्यार्थी निश्चित वापर करून स्वतःची गुणवत्ता वाढवतील असे सांगितले तर अध्यक्ष श्री सुरेश झेंड यांनी कंपनीचे सहकार्य नियमित शाळेला असते व यापुढेही ते राहील अशी आशा व्यक्त केली. शाळेला महिंद्रा कंपनी तर्फे डिजिटल बोर्ड मिळवून देण्यासंदर्भात सी एस आर हेड श्री अभिजीत जाधव व ॲडमिन श्री दादाराम मेहत्रे यांनी खूप छान सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुनीता कुलकर्णी यांनी केले .प्रास्ताविक शिक्षण समिती सदस्य डॉक्टर ज्योतीताई चोळकर यांनी केले .पाहुण्यांचा परिचय माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ रेखा परदेशी यांनी करून दिला .आभार सरस्वती शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्री प्रमोद देशक यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.