*रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टकडून तीन इंटरॅक्ट क्लब स्थापनेसाठी यशस्वी उपक्रम*

SHARE NOW

पुणे :

रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट च्या वतीने जुलै २०२५ मध्ये तीन शाळांमध्ये इंटरॅक्ट क्लब स्थापनेसाठी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रोटरी वर्ष २०२५–२६ साठी युवकांच्या सहभागाची ही सशक्त सुरुवात ठरली.

या कार्यक्रमांचे आयोजन पुढील शाळांमध्ये १८जुलै ते २५ जुलैच्या दरम्यान झाले.

रामराज्य हायस्कूल,

टीजी गोसावी हायस्कूल आणि

इपिफनी स्कूल.

यावेळी ३५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.नवनिर्वाचित इंटरॅक्ट बोर्डची स्थापना क्लबच्या अध्यक्ष अल्का ओसवाल, इंटरॅक्ट चेअरपर्सन अंकिता शाह आणि अनुक्रमे मेंटर्स यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

 

Advertisement

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जया शाह, विनायक देशपांडे आणि सुरेश शाह यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “देणगीचे महत्त्व, करिअरची दिशा आणि जबाबदार नागरिकत्व यांचे महत्व सांगितले. युथ डायरेक्टर संजय उपासनी यांनी केलेली साप्ताहिक इंटरॅक्ट उपक्रम सुरू करण्याची शिफारस सदर शाळांनी स्वीकारली.

 

श्रीकांत टरवडे,प्रीता जगदाळे आणि संध्या बोराणा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

सचिव राहुल शाह यांनी एएन सत्राचे आश्वासन दिले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचे भविष्यातील सीव्ही मध्ये समावेश करण्याचा सल्ला दिला. “युवकांमधून उद्याचे नेते घडवण्याचे काम रोटरी करते आणि इंटरॅक्ट क्लब हे त्याचे बीज आहेत,” असे अध्यक्ष अलका ओसवाल यांनी सांगितले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page