रोटरी सिटीतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनींना सॅनिटरी नॅपकिन वाटप व आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळा!

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

 

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने नुकताच पवन मावळ पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागातील शिवली येथील छत्रपती शिवाजी विद्यालय या शाळेतील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले तर योगशिक्षक शालिनी झगडे यांची आरोग्यविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न झाली. आरोग्यविषयक माहिती देत असताना योगाचे महत्त्व झगडे यांनी व्याख्याना द्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.पवना धरण परिसरातील डोंगराळ भागातील ७ ते ८ गावच्या शेतकरी कुटुंबातील मुलं या शाळेत शिक्षण घेतात. इयत्ता दहावीचा निकाल प्रत्येक वर्षी 100% असतो.

 

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी क्लबच्या माध्यमातून भरीव उपक्रम राबविण्याचा मनोदय रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त करताना शिवली शाळेतील राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व रोटरी सिटीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. तर रोटरी क्लब करत असलेल्या समाज उपयोगी उपक्रमांची माहिती देताना ग्रामीण भागात शिक्षण व पर्यावरण यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी करताना पवन मावळात संपूर्ण जिल्ह्यातील माॅडेल स्कूल आजिवली येथे करणार असल्याचे सांगितले. उपक्रमाच्या प्रकल्प प्रमुख स्वाती मुठे यांनी रोटरीच्या विविध अंगी उपक्रमांची माहिती देताना महिला सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील महिलांसाठी व विद्यार्थिनींसाठी विविध योजना राबविण्याचा मानस मुठे यांनी व्यक्त केला.*

Advertisement

*विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक संतोष जगदाळे व अध्यापकांनी रोटरी मेंबर्सचा शाल, श्रीफळ, व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख स्वाती मुठे यांनी केले सर्वांचे स्वागत सह प्रकल्प प्रमुख ॲड.वैशाली लगाडे यांनी केले.सूत्रसंचलन अध्यापक वशिष्ठ गटकुळ यांनी तर आभार संतोष जगदाळे यांनी केले.सदर प्रसंगी सेक्रेटरी संजय मेहता, क्लब ट्रेनर सुरेश शेंडे, मेंबरशिप डायरेक्टर नितीन शहा, स्पोर्ट डायरेक्टर संग्राम जगताप, सिने अभिनेते मोहन खांबेटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.*

*रघुनाथ कश्यप, विश्वास कदम, आनंद रिकामे, तानाजी मराठे, सुनंदा वाघमारे इ.सह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.*


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page