रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा भव्य कार्यकर्ता मेळावा व शाखा नामफलकाचे उद्घाटन संपन्न
पिंपरी चिंचवड –

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने प्रभाग क्रमांक 16, विकास नगर, किवळे येथे भव्य कार्यकर्ता मेळावा तसेच प्रभाग शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता ताई सोनकांबळे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कुणाल भाऊ व्हळकर, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष साम्राट जकाते, राज्य निमंत्रक विनोद चांदमारे, राज्य वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अजिज भाई शेख, शहर सचिव दयानंद वाघमारे, युवक अध्यक्ष धम्मरत्न गायकवाड, महिला शहराध्यक्ष कमलबाई कांबळे, मावळ कार्याध्यक्ष दिलीपराव कडलक, शहर खजिनदार गौतम गायकवाड यांच्या हस्ते झाले.
यानंतर इंद्रप्रभा हॉल, विकास नगर, किवळे येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या,
“रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष असून राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच आंबेडकरी विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा पक्ष एकमेव सक्षम आहे. बहुजन समाजातील आणि इतर समाजातील लोकांनी पक्षात सहभागी होऊन महापुरुषांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत आणि राजकीय सत्तेत सिंहाचा वाटा मिळवण्यासाठी एकत्रितपणे काम करावे.”
तसेच त्यांनी जाहीर केले की, आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 (किवळे, रावेत, मामुर्डी) येथून अनुसूचित जाती-जमातीचा उमेदवार महायुतीच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून उभा केला जाईल आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची राहील.
या मेळाव्यात विविध पक्षांमधील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली.
कार्यक्रमाला प्रभाग अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, उपाध्यक्ष उमेश मोरे, सचिव किरण कांबळे, सरचिटणीस अभिजीत चव्हाण, खजिनदार मेघराज ततरपाळे, तसेच शुद्धोधन वानखडे, रामभाऊ मनोहरे, सुधीर खंडारे, यशवंत गजभिये, कचरू कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सिद्धार्थ चव्हाण, सुभाष आगळे, सुनील गडहिरे, दीपक ओव्हाळ, राजेंद्र पवार, नारायण खंडागळे, अजय बखारीया, अनिल तंतरपाळे, सुनील ननवरे, पत्रकार विकास कडलक, मीनाताई कडलक, सुनिता मनोहरे, शालू खंडारे, मंगल ताई कडलक, जया तंतरपाळे, राजकुमार कलीमुर्ती, सत्यवेल चिन्नास्वामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन धर्मपाल तंतरपाळे, उपाध्यक्ष RPI व सिंधू धर्मपाल तंतरपाळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंधू धर्मपाल तंतरपाळे यांनी केले, तर आभार सुभाष आगळे यांनी मानले.






