पुणे जिल्हा भाजपकडून नगरपालिकांच्या प्रभारींची घोषणा — संघटन बळकटीसाठी महत्त्वाचा टप्पा

SHARE NOW

पुणे :

भारतीय जनता पक्ष, पुणे जिल्हा (उत्तर) तर्फे विविध नगरपालिकांसाठी प्रभारी नेमण्यात आले असून, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. भाजप पुणे जिल्हा (उत्तर) अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या पत्राद्वारे या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

 

ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि उर्जा व तंत्रज्ञान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांच्या संमतीने करण्यात आली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पुणे जिल्हा उत्तरमधील नऊ नगरपालिकांसाठी ही नियुक्ती लागू असून, स्थानिक पातळीवरील पक्ष कार्याला चालना देणे, समन्वय वाढविणे आणि विकास विषयक कार्यप्रवृत्ती अधिक गतिमान करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.

 

भाजप संघटनेचे जिल्हास्तरीय कार्य व्यापक प्रमाणात सुरू असून, स्थानिक पातळीवरील नेतृत्व अधिक जबाबदार बनविण्यासाठी ही पद्धत अवलंबली गेली आहे. संबंधित नगरपालिकांमध्ये प्रभारींची नियुक्ती झाल्यामुळे पक्षाच्या कार्यपद्धतीत शिस्त आणि संघटनात्मक सुसूत्रता निर्माण होईल, असे पक्षातील वरिष्ठ कार्यकर्त्यांचे मत आहे.

 

नियुक्त नगरपालिकांच्या प्रभारींची यादी पुढीलप्रमाणे :

 

१) लोणावळा नगरपालिका=संजय(बाळा) भेगडे.

२) तळेगाव दाभाडे नगरपालिका = गणेश किसनराव भेगडे.

३) आळंदी नगरपालिका =प्रदीप विद्याधर कंद

४) जुन्नर नगरपालिका =रामशेठ सदाशिव गावडे.

Advertisement

५) वडगाव नगर पंचायत =भास्करराव बाबुराव म्हाळसकर.

६) शिरूर नगरपालिका= संदीप उत्तमराव भोंडवे.

७) राजगुरुनगर नगरपालिका =डाॅ ताराचंद देवराम कराळे.

८) चाकण नगरपालिका = प्रियाताई नारायणराव पवार

९) मंचरनगरपालिका =प्रदीप (आबा) सखाराम सोनवणे.

 

या नव्या नियुक्त्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक प्रभारीकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील संघटनात्मक हालचालींचे नियोजन, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, तसेच नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी सर्व नव्या प्रभारींना शुभेच्छा देत म्हटले की, “भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून, समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती करणारी संघटना आहे. प्रत्येक प्रभारीने आपल्या नगरपालिकेत संघटनेचा विस्तार करत नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवावा.”

 

भाजपच्या पुणे जिल्हा (उत्तर) विभागासाठी ही नियुक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे. पक्षाची तळागाळातील संघटना मजबूत करण्यासाठी आणि विकासाच्या प्रश्नांवर जनतेशी थेट संपर्क वाढविण्यासाठी या नियुक्त्या निर्णायक ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

या पत्राची प्रत संबंधित प्रभारींना पाठविण्यात आली असून, येत्या काही दिवसांत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करून जबाबदाऱ्यांचे औपचारिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांकडून मिळाली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page