प्रधानमंत्री पीकविमा योजना 2024 माहिती प्रत्यक्षात शेतावर जाऊन शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली.
डोणे (मावळ ):
डोणे येथे प्रधानमंत्री पीकविमा योजना 2024 तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषि अधिकारी अक्षय ढुमणे व कृषि पर्यवेक्षक मिनाज शेख ह्यांनी प्रचार प्रसिद्धी शेतावर जाऊन करताना ह्यावेळी सरपंच -: ऋषिकेश कारके, ग्रामपंचायत सदस्य -: बाळू वाघमारे, गबळू वाघमारे व इतर शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याबाबत आव्हान
प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024 राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पीक विमा काढता येणार असून ह्याची बाकी रक्कम राज्य सरकार व केंद्र सरकार भरणार आहे ह्याची मुदत 15जुलै पर्यंत आहे
www.pmfby.gov.in ह्या पोर्टल वर भरता येणार आहे.विमा भरण्यासाठी -: जवळच्या कोणत्याही महाइसेवा केंद्रात भरण्याची सुविधा उपलब्ध आहे
भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -:
7/12 उतारा
8अ उतारा
बँक पासबुक
आधार कार्ड
स्वयंघोषणा पत्र
योजनेत समाविष्ट पिके -: भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणी, ज्वारी,उडीद, तूर,
अंतिम मुदत खरीप हंगाम -: 15जुलै 2024
जोखीम बाबी -: पेरणी पासून काढणी पर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, पिकाच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जसे कि पूर, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ इत्यादी मुळे होणारे 50%पेक्षा जास्त नुकसान झाल्यास
पीक काढणी नंतर नुकसान झाल्यास पंचनामा करून नुकसान भरपाईस पात्र जसे कि भात पेंढ्या सुकवणीस ठेवल्यास त्या बिगर मौसमी पावसाने होणारे नुकसान.
योजनेत कोणाला सहभागी होता येणार -: 7/12उताऱ्यावर नाव असणे आवश्यक त्यावर संबंधित पिकाची नोंद असणे आवश्यक (नसेल तर पिकाची नोंद लावून घेणे आवश्यक )पिकाची नोंद नसल्यास भरपाई मिळण्यास अपात्र ठरतो
कर्जदार व बिगरकर्जदार शेतकरी सहभागी होऊ शकतो.