कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडियम स्कूलची शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रभेट यशस्वी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन मास्क पॉलिमर्स इंडस्ट्रीच्या व्यवस्थापनाच्या वतीने मा. रविना म्हस्के मॅडम यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे व मार्गदर्शनामुळे शक्य झाले.

 

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी बुधवार, दि. १७ डिसेंबर २०२५, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार, दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी या औद्योगिक क्षेत्रभेटीचा लाभ घेतला. विद्यार्थी सकाळी ९.१५ वाजता शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरातून रवाना झाले.

Advertisement

तेथे पोहोचल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून उद्योगाची उद्दिष्टे कार्यपद्धती व उत्पादन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना उत्पादन विभागाची मार्गदर्शित पाहणी करून देण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध रबर घटकांच्या निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली.

रबर वितळविण्याची प्रक्रिया, अत्याधुनिक यंत्रसामग्री, मोल्डिंग पद्धती तसेच उत्पादन तंत्रज्ञानाबाबत उद्योगातील तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. या क्षेत्रभेटीचे नियोजन शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ ज्योती सावंत मॅडम यांनी केले होते व विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या संबधीत वर्गशिक्षक तसेच सहकारी शिक्षक उपस्थित होत्या.

ही शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व माहितीपूर्ण ठरली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page