तळेगावकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार काव्यसंमेलन व गझल- मुशायरा
दि.१२. तळेगाव: ललित कला फाउंडेशन ठाणे व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ जाने रोजी दुपारी २ वाजता फार्मसी हाॅल इंद्रायणी काॅलेज कॅम्पस येथे तळेगावाकर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या कविता तसेच गझल – मुशायरा मैफिल – ए – सुखन ऐकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी समारंभाच्या अध्यक्षस्थानी लेखक कवी डॉ.संभाजी मलघे गझल सादर करते डॉ.कुणाल इंगळे प्रमुख अतिथी म्हणून रोहिदास पोटे प्रा.तुकराम पाटील, डॉ.सुभाष कटकदौंड, डॉ.अपर्णा महाजन
मसाप मावळचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे तसेच मावळ तालुक्यातील कवी उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे निमंत्रक संस्थापक श्रीकांत पेटकर अध्यक्ष दिलीप कारखानीस,सोमीनाथ सोनावणे, गझलकार मोहन जाधव असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी काळे व प्रणय इंगळे करणार आहेत अशी माहिती अध्यक्ष कारखानीस यांनी दिली आहे.