जांभूळ फाटा येथे भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू, हायवा चालक फरार

SHARE NOW

मावळ  – जुन्या मुंबई-पुणे हायवेवर जांभूळ फाटा येथे माउली हॉटेल समोर शनिवारी (दि. 13 सप्टेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार अविनाश चंद्रकांत दोडमणे (वय 21, रा. शिवतेज नगर, अप्पर इंद्रानगर, बिबवेवाडी, पुणे) याचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश मोटारसायकल (एमएच 14 एलवाय 3205) वरून रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात हायवाने त्याला जोरदार ठोकर दिली. अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला. या धडकेत अविनाश गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले.

Advertisement

 

या प्रकरणी अविनाशचा चुलत भाऊ कुमार जयभीम दोडमणे यांनी तळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात हायवा चालकाविरुद्ध भा.दं.सं. कलम 281, 125(b), 106, 324(4) आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

तळेगाव पोलीस तपास करत असून, आरोपीचा शोध सुरू आहे. तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार सचिन कदम (1601) यांच्याकडे देण्यात आली आहे.

 

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page