हिंदूस्मशानभूमीत शवदहनासाठी अंनपा.ने लाकडे व इंधनाचा मोफत पुरवठा करावा.. — सुभाष साळुंके, (मा.नगरसेवक) यांची मागणी
अंबरनाथ :
अंबरनाथ शहर हे कामगार व मध्यमवर्गीयांचे शहर म्हणून ओळखले जाते,
माजी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहराने आपल्या विकासकामांचा आगळावेगळा पॅटर्न निर्माण केला आहे,
नागरीकरण दिवसेंदिवस वाढत असून अंबरनाथकरांना अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात कार्यक्षम खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांचे कल्पक नेतृत्व व प्रयत्न महत्वाचे आहेत,त्याचप्रमाणे स्थानिक आमदार डॉ.बालाजी किणीकर यांचा नियमित पाठपुरावा असतो.
अंबरनाथकराना अनेक महत्त्वाचे व उपयुक्त प्रकल्प दिल्याने समाधान व्यक्त होत असतानाच अंबरनाथ स्मशानभूमी अद्यावत पर्यावरणपूरक सोयी सुविधा करण्याबाबत तसेच अंत्यसंस्कार करिता विनामूल्य लाकडांचा पुरवठा व्हावा, अशी मागणी होत आहे,
याबाबत वारंवार मागणी केलेली असून आज अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी/प्रशासक श्री. उमाकांत गायकवाड यांना निवेदन देऊन चर्चा केली,
अंत्यविधीवेळी लाकडांचा होणारा खर्च ₹ ३०००/- न. पा. ने संबंधित स्मशानभूमी देखभाल करणारे मे.PSL वेस्ट मॅनेजमेंट प्रा.लि. यांस देण्यात यावा, अशा केलेल्या मागणीस प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.






