आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी शिंदेवाडी-भोर-वरंधा ते महाड या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली
(भोर तालुका प्रतिनिधी )
शिंदेवाडी-भोर-वरंधा ते महाड या रस्त्याच्या कामाची आज आमदार शंकर मांडेकर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या प्रकल्पाच्या मार्गातील तांत्रिक अडचणी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भोर पंचायत समितीच्या सभागृहात संबंधित शेतकरी बांधव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.
प्रशासनाला या कामातील अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.
याप्रसंगी भोर प्रांत अधिकारी डॉ.विकास खरात, पुणे जि.प. माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती मनिषाताई कंक, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, उपसभापती विशाल कोंडे, तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संतोष घोरपडे, NHAI उपअभियंता कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कृणाल धुमाळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






