तळेगाव एमआयडीसीत बेकायदा धंद्यांचे जाळे; नागरिक त्रस्त, पोलिसांवर संगनमताचे आरोप

SHARE NOW

नवलाख उब्रे(मावळ): तळेगाव एमआयडीसी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत व्यवसायांनी अक्षरशः हातपाय पसरले असून दारू विक्री, अवैध वेश्या व्यवसाय आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी बेकायदा धंद्यांचे अड्डे निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

 

एमआयडीसीतील काही भागांत खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असून रात्रीच्या वेळी बाहेरील संशयित व्यक्तींची वर्दळ वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे परिसरातील महिला, कामगार आणि कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

Advertisement

 

विशेष म्हणजे, या बेकायदा व्यवसायांना स्थानिक पोलिसांचेच अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. कारवाईचे फक्त दिखावे होतात; मात्र धंदे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतात, असा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे अनधिकृत धंदे करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याचेही बोलले जात आहे.

 

दरम्यान, एमआयडीसी परिसरात वाढलेल्या या गैरप्रकारांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून तरुण पिढी चुकीच्या मार्गाकडे वळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अवैध व्यवसायाचे कलेक्शन(वसुली) एका निवृत्त पोलिसाच्या मार्फत होत आहे.

पोलिस कोमात आणि बेकायदा धंदे जोमात, अशी संतप्त प्रतिक्रिया सध्या तळेगाव एमआयडीसी परिसरातून उमटताना दिसत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page