ॲड. पू. वा. परांजपे विद्यामंदिर प्रशालेची यशस्वी घोडदौड,दहावी परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे येथील ॲड. पू. वा. परांजपे विद्यामंदिर प्रशालेने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सलग पाच वर्षे दहावी परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

शाळेच्या या यशामागे मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा विश्वास यांचा मोठा वाटा असल्याचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापनाने सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे शाळेची गुणवत्ता दिवसेंदिवस उंचावत आहे.

गेल्या काही वर्षांत शाळेतील घटलेली विद्यार्थी संख्या 537 वरून 960 इतकी लक्षणीयरीत्या वाढली असून परिसरातील पालकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये योगा मेडिटेशन , स्पोकन इंग्लिश, शिष्यवृत्ती मार्गदर्शन,संस्कार, शिस्त, क्रीडा व सांस्कृतिक जाणीवा रुजविण्याचे कार्यही प्रशालेत प्रभावीपणे केले जात आहे. गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्ह्यात अग्रेसर मुख्यमंत्री माजी शाळा स्वच्छ शाळा अग्रेसर

Advertisement

यासोबतच शाळेमध्ये न भूतो न भविष्यती अशा भौतिक सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. आधुनिक वर्गखोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड, शिक्षण व्यवस्था, ग्रंथालय, क्रीडासाहित्य आधुनिक स्वच्छतागृह मुला मुलींसाठी आधुनिक संगणक लॅब आधुनिक प्रयोगशाळाआणि विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षणाचे वातावरण लाभत आहे.

यावर्षी दहावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये —

प्रथम क्रमांक भोकरे धनश्री विलास 92.80 %द्वितीय क्रमांक दराडे आदित्य अनिल कुमार 92.60%तृतीय क्रमांक तरवडे प्रमोद विलास 92.40% चतुर्थ क्रमांक धामणकर शर्वरी संदीप 91.20% मार्क मिळूनउत्तीर्ण झाले

शाळेच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री श्री. संजय तथा बाळा भेगडे साहेब, उपाध्यक्ष श्री .नंदकुमार शेलार साहेब, उपक्रमशील सचिव श्री. संतोष खांडगे साहेब खजिनदार श्री.राजेश म्हस्के साहेब, सहसचिव विनायक अभ्यंकर साहेब,शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे साहेब, सर्व संचालक मंडळ, सल्लागार मंडळ शाळेचे कार्यकुशल मुख्याध्यापक श्री.पांडुरंग पोटे पर्यवेक्षिका सौ रेखा भेगडे कार्यरत सौ सुमन जाधव इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री.संजय खराडे, सौ. आशा आवटे सौ .अनिता नागपुरे सर्व शिक्षकवृंद, पालक आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकजुटी चे हे यश आहे असे आवर्जून शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे सर यांनी सांगितले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page