सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे :
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ आज सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचा उद्देश मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाबद्दल अभिमान जागृत करणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेत स्थापनेपासून कार्यरत असलेल्या सहशिक्षिका पूनम केंगरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि ध्वजारोहणाने झाली. त्यांनी आपल्या मनोगतात शाळेची होणारी प्रगती याचे कौतुक केले.
माननीय समिती सदस्य, श्री सुनील भेगडे सर (अध्यक्ष), विजय गरूड सर (उपाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले.सचिव दत्तात्रय नाटक सर, समिती सदस्य श्री खंडुजी टाकले सर यांनी या प्रसंगाची शोभा वाढवली.
सहशिक्षिका मयुरा कुलकर्णी मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर माधुरी चौधरी मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.






