“डोके सुरक्षित तर जीव सुरक्षित!” — हेल्मेटचा वापरच अपघातावर रामबाण उपाय

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. “डोके आहे सर्वात नाजूक, हेल्मेट लावून व्हा जागरूक” या संदेशातून वाहनचालकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

Advertisement

अपघाती मृत्यूच्या आकडेवारीनुसार, तब्बल 60 टक्के दुचाकीस्वार हे हेल्मेट न घातल्यामुळे मृत्युमुखी पडतात, ही गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन हेल्मेटचा नियमित वापर करणे अत्यावश्यक आहे.

तसेच, वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियम पाळणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे आणि सीटबेल्टचा वापर करणे या बाबींवरही विशेष भर देण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, “सुरक्षित प्रवासासाठी नियम पाळा आणि अपघात टाळा,” कारण आपली एक छोटी चूक मोठा धोका निर्माण करू शकते


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page