युवासेना मावळ संपर्क प्रमुखपदी प्रशांत तावरे यांची निवड; मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान

SHARE NOW

मावळ :

मावळ तालुक्यात युवासेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्रशांतजी तावरे यांची मावळ संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र उद्योग मंत्री उदयजी सावंत, खासदार श्रीरंग आप्पा बारणे तसेच जिल्हा प्रमुख राजू भाऊ खांडभोर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Advertisement

यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत तावरे यांच्या निवडीमुळे मावळ तालुक्यात युवासेनेचे कार्य अधिक जोमाने वाढेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

नवीन जबाबदारी स्वीकारताना प्रशांत तावरे यांनी संघटनेच्या वाढीसाठी कटिबद्ध राहून कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page