लोणावळ्यात महावीर जन्मकल्याणक समाजसेवेने साजरा; मारवाडी महिलांचा प्रेरणादायी उपक्रम

SHARE NOW

लोणावळा :

जैन धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण सण असलेल्या महावीर जन्म कल्याणक निमित्त लोणावळ्यातील मारवाडी महिलांनी सण साजरा करण्याची एक आगळी-वेगळी आणि समाजाभिमुख परंपरा निर्माण करत प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.

या निमित्ताने महिलांनी अहिरवडे येथील किनारा वृद्धाश्रम येथे भेट देत तेथील ज्येष्ठ नागरिकांसाठी चार पंखे तसेच धान्य स्वरूपात देणगी दिली. या मदतीमुळे वृद्धाश्रमातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे हास्य फुलले.

या उपक्रमात अमृता लुनावत, दीप्ती लुनावत, सीमा लुनावत, स्वाती पारक, सोनल ललवानी, रंजू लुनावत, सारिका सुराणा, आयान्श लोनावत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच इतर महिलांनीही मनापासून सहकार्य करून हा उपक्रम यशस्वी केला.

Advertisement

यावेळी अमृता लुनावत यांनी किनारा वृद्धाश्रमाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सण साजरा करताना केवळ आनंदोत्सव न करता समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून गरजूंसाठी काहीतरी देणे, हीच खरी सेवा असल्याचा संदेश त्यांनी दिला.

“आपण समाजाचे देणेदार आहोत आणि दान-सेवा हीच खरी धर्म साधना आहे,” हा भगवान महावीर यांचा संदेश या महिलांनी आपल्या कृतीतून प्रत्यक्षात उतरवला आहे.

या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारे सण साजरे करून समाजसेवा करण्याची प्रेरणा इतरांनाही मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page