जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप
राजेवाडी :
दि.३० मार्च २०२६ रोजी इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्ती व इनरव्हील क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी दिवड तालुका मावळ येथे इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांकरिता शौचालयासाठी पाण्याची लाहीन… सिंटेक्स टाकी… छोटा पंप.. गार्डन ला पाणी देण्याकरिता पाईप बंडल.. शाळेची कंपाउंड वॉलचे पेंटिंग शाळेतील मुलांना… जेवणाचा डबे.. पारंपारिक खेळ खेळण्या करिता दोरी उडी… घुंगरू काठी.. अभ्यास करण्यासाठी तक्ते.. ग्रंथालयासाठी पुस्तके इत्यादी शैक्षणिक साहित्य मुलांना देण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवर इनरव्हील क्लब पुणे अध्यक्षा सौ.माधवी पुरोहित …इनरव्हील क्लब मावळ शक्ती अध्यक्षा सौ. ज्योतीताई भरत राजिवडे.. दिवड चे सरपंच श्री.गणेश राजीवडे …मावळ शक्तीच्या सचिव सुरैया शेख.. इनरव्हील पुणे च्या सचिव सौ.सुजाता जयवंत …मावळ शक्तीच्या खजिनदार सौ.राजश्री नाईकरे पुणे क्लबच्या खजिनदार सौ.सविता तामाने .. एडिटर सौ. रेखा बरीदे मा.श्री. भरत नाना राजिवडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व स्वागत गीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुणे क्लबचे अध्यक्षा माधवी पुरोहित यांनी आपल्या मनोगतात शाळेला साहित्य ..पेंटिंग व पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे असे आपल्या मनोगत वारंवार उल्लेख करून शाळे बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या व इथून पुढेही काही शाळेला मदत लागली तर नेहमी आम्ही करत जाऊ असे आश्वासन दिले. मावळ शक्तीच्या अध्यक्षा सौ.ज्योती राजिवडे यांनी आपल्या मनोगतात शाळेसाठी केव्हाही कोणतीही मदत लागली तर आमचा क्लब हा नेहमी शाळेसाठी व मुलांच्या शिक्षणासाठी खूप चांगलं काम करत आहे व इथून पुढेही करत राहू असा शब्द दिला.
दिवड चे सरपंच मा. श्री गणेश राजीवडे यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील शाळे करीता पुरेसा निधी उपलब्ध नसतो त्यामुळे शाळेची कामे वेळेवर होत नसतात आपल्यासारख्या संस्था खेडेगावात येऊन मुलांसाठी खूप छान काम करतात त्याबद्दल दोन्ही ही संस्थेचे अध्यक्ष यांचे व इतर सभासदांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक मा.श्री. गणेश दिवर यांनी केले व आभार सामाजिक कार्यकर्ते मा श्री महेंद्र राजीवडे यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी माजी उपसरपंच श्री प्रकाश राजीवडे …श्री.शशिकांत पडवळ …श्री.शशिकांत राजीवडे…श्री. नितीन शेडगे श्री. भिकाजी राजीवडे सौ. चंद्रभागा राजीवडे सौ. स्नेहलताई राजीवडे सौ.छायाताई राजिवडे.. अश्विनी बेंद्रे ..सौ. मंजुळाताई सावळे तसेच इतर पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
मुलांना फळे व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली






