इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च,येथे “लैंगिक शिक्षण” विषयावर व्याख्यानाचे आयोजन
तळेगाव दाभाडे :
दिनांक 30/03/2026 रोजी, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि रिसर्च, तळेगाव दाभाडे मावळ, पुणे येथे “लैंगिक शिक्षण” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या सत्राचे वक्तृत्व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ, जनरल हॉस्पिटल आणि पवार हॉस्पिटल तळेगाव दाभाडे ,येथील डॉ. शशिकांत पवार, यांनी केले. त्यांनी लैंगिक शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता, संबंध, शोषण आणि हिंसा यासंबंधी विस्तृत चर्चा केली आणि विद्यार्थिनींना या विषयाची जागरूकता आणि माहिती प्रदान केली.
या व्याख्यानाचा उद्देश समाजात निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयांबद्दलचे सामान्य गैरसमज दूर करणे, मोकळ्या चर्चेला प्रोत्साहन देणे हा होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. संजय आरोटे सर, प्राचार्य यांनी भूषवले, तर आयोजन डॉ. जी. एस.शिंदे सर विभागप्रमुख, डॉ. योगेश झांबरे ,प्रा. मयूर लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सूत्रसंचालन कु. प्रीती यादव (द्वितीय वर्ष डी. फार्म) यांनी केले आणि आभार प्रदर्शन कु.नयना मोहिते (द्वितीय वर्ष बी. फार्म) यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ. पायल थोरात, प्रा.अंकीता बेर्डे, प्रा. निलम पटांगरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, सचिव श्री. चंद्रकांत शेटे व खजिनदार सौ. निरुपा कानिटकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या आणि जागरूकता वाढवणाऱ्या उपक्रमांना सातत्याने पाठिंबा देते.






