अलंकापुरीत रामजन्मोत्सव सोहळ्याची हरिनाम गजरात सांगता रामरायांच्या पालखीचे माऊली मंदिरात स्वागत ; श्रींची पूजा

SHARE NOW

आळंदी :

आळंदी येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( श्री राम मंदिर ) श्रींचे वैभवी मंदिरात श्री रामजन्मोत्सव सोहळ्याची ( सन 2026 ) विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रींचे पालखीची माऊली मंदिर आणि ग्राम प्रदक्षिणा मिरवणुकीने रामजन्मोत्सव सोहळ्याची सांगता हरिनाम गजरात झाली. तत्पूर्वी श्रींचे जन्मोत्सवा निमित्त ज्ञानेश्वरबुवा कपलाने महाराज यांचे हृदयस्पर्शी वाणीतून सुश्राव्य नारदीय कीर्तन सेवा, श्रींचा अभिषेख, पूजा, वेदमंत्र जय घोष, हरिनाम गजर परंपरेने झाला. जन्मोत्सव होताच श्रींचे मंदिरात पुष्प वर्षाव करत श्रींची मंदिर प्रदक्षिणा झाली. या वेळी मंदिरात भाविकांनी दर्शनास प्रचंड गर्दी केली. भाविकांना श्रींचे दर्शन थेट जागेवर जाऊन देण्यात आले.

भाविकांनी ज्ञानेश्वरबुवा कपलाने यांचे नारदीय कीर्तन श्रवणास तसेच श्री रामजन्मोत्सवास मोठी गर्दी केली होती. श्रींचे मंदिरात लक्षवेधी विद्युत रोषणाई, लक्षवेधी विविध रंगी फुलांची पुष्प सजावट, आरास, रंगरंगोटी, ग्रामप्रदक्षिणा मार्गावर रांगोळ्यांचे पायघड्या, बँड, नगारखाना वाजत गाजत सवाद्य ग्रामप्रदक्षिणा आणि श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी, अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील साधक वारकरी विध्यार्थी यांनी हरिनाम गजर करीत जय श्री राम, जय राम, जय जय राम नामजयघोष करीत ग्राम प्रदक्षिणा करीत सोहळ्याची सांगता श्री राम मंदिरात परंपरेने आरती, प्रसाद वाटपाने झाली. या प्रसंगी शांतता कमेटी सदस्य माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी. भोसले पाटील, संकेत वाघमारे, माउली घुंडरे पाटील, गोविंद ठाकूर तौर, बाबासाहेब भंडारे, दिनेश मावडीकर, विलास वाघमारे, भाऊ पाटील, मंगेश तिताडे, मोहन महाराज शिंदे, माऊली महाराज जाधव, शिवतेज मित्र मंडळ परिवार आदी मान्यवर यांनी उपस्थित होते.

रामजन्मोत्सवात श्रींचे वैभवी श्री राम मंदिरात संगीत, नृत्य गायन सेवा तसेच ज्ञानेश्वर महाराज कपलानेबुवा यांच्या हृदयस्पर्शी वाणीतून नारदिय कीर्तन सेवा, आळंदीकर ग्रामस्थ गावकरी भजनी मंडळ यांची भजन सेवा सोहळ्यात रुजू झाली. आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे वतीने श्री रामजन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यात सुमारे 250 वर मान्यवर पदाधिकारी, आळंदीकर ग्रामस्थ गावकरी भजनी मंडळ सेवक, भाविक नागरिक, संगीत साधक, माजी विश्वस्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. श्री रामजन्मोत्सवा निमित्त सकाळी ज्ञानेश्वर महाराज कपलाने बुवा यांच्या हृदयस्पर्शी वाणीतून नारदिय कीर्तन सेवा रुजू झाली. सोहळ्यात वेद पाठशाला आळंदी यांच्या मार्फत रुद्र अभिषेकाचे मंत्र पठण झाले. सोहळ्यात भरतनाट्यम डॉ. परिमल फडके परिमल परफॉर्मिंग आर्ट अँड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सादर झाले. शब्दविणे संवादू भक्ती पूर्व वाद्य संगीत पंडित रमाकांत पराजपे,अभंग वाणी व भावगीत हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी ताई रोकडे महाराज, रामकृष्णजी गरड महाराज, मुक्ता कुलकर्णी गरसोळे, रामलीला सई देशपांडे, गजर रामनामाचा नितीन आवेकर, सेक्सोफोन वादन संजय भावे, संतांचिया गावा राग संगीत अभंग अर्पणा केळकर, भक्ती संगीत भज मन राम अमिता घुगरी व तुषार रिठे, भजन राम पर्व ऐक ध्यास हेमंत आठवले, बासरी वादन अमित खरे. अभंग व भक्तीगीत ज्योती गोराणे, श्यामजी गोऱ्हाणे, वारकरी भजन ह.भ.प. आबा महाराज गोडसे, शास्त्रीय वायलिन वादन विद्या इंगळे, रमा चोभे आदींचे संगीत गायन सेवा कार्यक्रम राम मंदिरात झाले. या प्रसंगी आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे मुख्य विश्वस्त राहुल आवेकर, विश्वस्त अविनाश गुळुंजकर, विश्वस्त अर्जुन मेदनकर, लक्ष्मीकांत दंडनाईक, चिन्मय चोभे, रमेश मुसुडगे, माजी विश्वस्त बिपीन चोभे, ओक काका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. भाविकांची श्रींचे जन्मोत्सवास मोठी गर्दी झाली होती. श्रींचे जन्मोत्सव दिनी श्रींचे मंदिरात पूजा, अभिषेक, दर्शन, प्रसाद वाटप, आरती परंपरांचे पालन करीत झाली.

Advertisement

चंदन उटीतून माऊलींच्या संजीवन समाधीवर साकारला शिंदेशाई अवतार.

राम जन्मोत्सव सोहळ्यात परंपरेने नवमी दिनी माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतील श्रींचे वैभवी शिंदेशाही राजबिंडे रूप परिश्रम पूर्वक साकारण्यात आले.

नवमी निमित्ताने संजीवन समाधी वर चंदन ऊटी शिंदेशाही पगड़ी अवतार पुण्यातील मूर्तिकार अभिजीत धोंडफळे आणि सहकारी यांनी चंदन ऊटीचा वापर करीत लक्षवेधी श्रींचे राजबिंडेरूप साकारले. नेत्र दीपक चंदन उटी भाविकांनी आपआपल्या नेत्रात साठवून ठेवण्यास मोठी गर्दी केली होती. या वेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी, मानकरी, आळंदीकर नागरिक, भाविक आदींनी चंदन उटी पाहण्यास माऊली मंदिरात गर्दी केली. आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे प्रमुख विश्वस्त राहुल आवेकर, अर्जुन मेदनकर, चिन्मय चोभे, बिपीन चोभे, रमेश मुसुडगे, लक्ष्मीकांत दंडनाईक, उदय काळे, बाबासाहेब भंडारे, लक्ष्मण मेदनकर, योगेश सुरू, माऊली उर्फ बापू कुऱ्हाडे पाटील, काका ओक, महेश काका अयाचित आदी मान्यवर उपस्थित होते. श्री रामरायांचे पालखी मंदिर प्रदक्षिणा पूजन प्रसंगी माऊली देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते सत्कार करण्यात आले. या प्रसंगी देवस्थानचे पालखी सोहळ्याचे मानकरी, पदाधिकारी उपस्थित होते. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, माजी प्रमुख विश्वस्त व विद्यमान विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, वैजयंता उमरगेकर, सुरेश काका वडगावकर, माजी उपाध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, सागर भोसले, तुकाराम महाराज ताजने, बाळासाहेब महाराज शेवाळे आदींनी सोहळ्यास भेट दिली. आळंदी महाद्वार येथे सकल हिंदू समाज आळंदी पंचक्रोशीचे वतीने श्रींची पूजा, पाळणा, आरती भव्य मिरवणूक उत्साहात झाली. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मछिंद्र शेंडे यांचे मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आळंदीतील विविध कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात परंपरेने शांततेत साजरे झाले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page