देहूगाव परिसरात रामनवमी उत्साहात
देहूगाव
देहूगाव येथील मुख्य मंदिरात देहू देवस्थान संस्थानच्या वतीने श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली.

आम्हासाठी अवतार । मत्स्यकुर्मादि सूकर ॥ मोहे धावे घाली पान्हा। नाम घेता पंढरीराणा ॥कोठे न दिसे पाहता। उडी घाली अवचिता ॥सुख ठेवी आम्हासाठी । दुःख आपणची घोंटी ॥ आम्हा घाली पाठीकडे । तुका म्हणे काम गाढे ॥
या अभंगावर किर्तन
श्रीरामनवमी उत्सवानिमित्त देहूतील मुख्य मंदिरात सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ .प . पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता प्रभू श्रीराम जन्म सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी फुलांचा वर्षाव केला.
देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त यांच्या हस्ते, श्रीराम प्रभू यांच्या मूर्तीस महाभिषेक करून महापूजा न करण्यात आली, तसेच सुटवड्याचा प्रसाद . – दाखवण्यात आल्या. त्यानंतर संत तुकारामक भक्तांना सुंटवड्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. गुरुवार असल्याने आणि श्रीरामनवमी असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी केली होती. रामनवमी निमित्त श्रीराम मंदिरात व इतर व ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट केली . देहू संस्थान परिसरात फटाके बाजी करून रामजन्म उत्सव साजरा करण्यात आला
श्रीराम मंदिरात महापुजा आरती विश्वस्त जालीधर महाराज मोरे गणेश महाराज मोरे वैभव महाराज मोरे दिलीप महाराज मोरे माझी विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे धनंजय महाराज मोरे माणीक महाराज मोरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली
देहू शहरात भव्य शोभायात्राश्रीरामचंद्र जन्मोत्सावानिमित्त विश्वहिंदू परिषद सकल हिंदू समाज व बाळ ठाकुर मित्र परिवार शोभायात्रा काढण्यात आली तसेच
आणि बजरंग दल देहूरोड प्रखंड यांच्या वतीने देहूरोड तसेच देहूगाव व परिसरात तळवडे न येथे तळवडे परिसरात हिंदू समाजाच्या वतीने शोभा यात्रा काढण्यात आली होती.
भाविक-भक्तांनी केला फुलांचा वर्षाव
यज्ञ, शोभा यात्रा सकाळी ९ वाजता श्रीरामांचा
अभिषेक, सकाळी १० वाजता सामाजिक समरसता यज्ञ आणि सकाळी १२ वाजता महाआरती व प्रसाद श्रीराम मंदिर शीतळानगर मंदिर या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता श्रीराम नवमी शोभा यात्रेस प्रारंभकरण्यात आला. अशा प्रकारे देहूगाव व पंचक्रोशी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आकरण्यात आला.
शहर परिसरात शोभायात्रा, धर्मसभा, महाप्रसाद वाटप
प्रभूरामचंद्र मूर्ती, धर्मवीर छत्रपती संभाजी रथ तसेच राष्ट्रीय पुरुष, राष्ट्रीय माता यांचा सामाजिक समरसता रथ शोभायात्रा काढण्यात आली. देहूरोड येथे श्रीरामनवमी निमित्त सायंकाळी ६ वाजता भव्य दिव्य अशी शोभा यात्रा काडण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी विध्यालया पासून या शोभा यात्रेस प्रारंभं करण्यात आला. रात्री ९ ते १२ धर्मसभा व महाप्रसाद देण्यात आला. त्यानंतर ही शोभा यात्रा एम बी कॅम्प शाळा मैदानावर आल्यानंतर या शोभा यात्रेची सांगता करण्यात आली.






