“नुतन संस्कृती-२०२६” वार्षिक स्नेहसंमेलन नूतन अभियांत्रिकीमध्ये उत्साहात संपन्न नुतन महाराष्ट्र अभियांञिकीमध्ये थिरकली तरुणाई…..
तळेगाव दाभाडे :
नुतन महाराष्ट्र अभियांञिकी महाविद्यालयाचे *”नुतन संस्कृती-२०२६”* हे वार्षिक स्नेहसंमेलन महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.शेखर रहाणे यांनी केले.संचालक डाॅ.प्रमोद पाटील यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला.नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,माजी राज्यमंत्री संजय ( बाळा )भेगडे यांनी आपल्या खुमासदार शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन व संस्थेचे खजिनदार राजेश म्हस्के, मावळभुषण,शिक्षणमहर्षी व मंडळाचे माजी अध्यक्ष कै.कृष्णराव भेगडे यांच्या कन्या राजश्री म्हस्के, सीईओ डाॅ.रामचंद्र जहागिरदार,डिन डाॅ.सागर शिंदे व प्रबंधक विजय शिर्के आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
*”नुतन पराक्रम-२०२६”* अंतर्गत विविध क्रिडा स्पर्धांमधील विजेत्यांचा ,सर्वोच्य प्लेसमेंट तसेच कलाविभागातील गुणी विध्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यंदाच्या कै.कृष्णराव भेगडे कार्यगौरव पुरस्काराने डाॅ.सौरव सावजी,डाॅ.रेणुका काजळे,प्रशांत सुतार,सुनिता सुपेकर व अतुल देशपांडे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार डाॅ.हर्षा सरोदे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता *”नुतन कलाविश्व”* आयोजित विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाने अत्यंत जल्लोशात झाली.






