जागतिक महिला दिन व खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन ,अनिता पांचाळ यांच्या रूपाने शिवसेनेला काळेवाडीत लढवयी नेतृत्व मिळाले – उपनेत्या सुलभा उबाळे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:-

जागतिक महिला दिनानिमित्त व मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त काळेवाडी येथील बालाजी लॉन्स येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
काळेवाडी मधील महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते प्रभागातील 50 महिला बचत गटांना बक्षीस वितरण करून सन्मानित करण्यात आले,गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजय महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले .नवरात्र नवरंग महिला वेशभूषा स्पर्धेतील विजय महिलांना आकर्षित बक्षीस देण्यात आले .
त्यावेळी बोलताना शिवसेना उपनेते सुलभाताई उबाळे म्हणाले की, निवडणुकीमध्ये अनिताताई पांचाळ यांना अपयश आले असले तरी त्यांनी खचून न जाता सामाजिक कार्य चालू ठेवले आहे .त्यांच्या पाठीशी त्यांचे पती बालाजी पांचाळ यांची खंबीर साथ पाहायला मिळत आहे, हे अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे .अनिता पांचाळ संघर्ष करणारी कार्यकर्ती आहे .या कार्यक्रमातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की कितीही अडचणी आल्या , त्यावर मात करते तीच खरी महिला .महिलांनी आता सक्षम झालं पाहिजे .हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहून अनिताताई पांचाळ यांची सर्वसामान्य महिलेचे असलेले नाव व महिला संघटन दिसत आहे .पांचाळ ताईच्या पाठीमागे शिवसेना खंबीरपणे उभी राहील असे मत उबाळे यांनी व्यक्त केले .
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे याप्रसंगी बोलताना म्हणाले की अनिता पांचाळ यांचे महिलांचे संघटन मजबूत पाहायला मिळत आहे . महिलांसाठी व संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य दिव्य कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असे नियोजन केले आहे त्याबद्दल आपले अभिनंदन .बचत गटातून महिलांना व विविध स्पर्धेतील महिलांना बक्षीस वितरण करून प्रोत्साहन देण्याचा काम अनिता पांचाळ करीत आहेत .होम मिनिस्टर कार्यक्रमाचे कौतुक विश्वजीत बारणे यांनी केले आहे .
कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुलभाताई उबाळे , उपनेते इरफान भाई सय्यद ,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिवसेना पक्षाचे गटनेते विश्वजित बारणे, शहरप्रमुख निलेश तरस ,जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर ,महिला जिल्हाप्रमुख शीलाताई भोंडवे,
युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचारणे,प्रबोधनकार शारदा ताई मुंडे, सुनील तात्या पालकर, दिलीप कुसाळकर ,मंगेश नढे ,सुधाकर नलावडे ,रवी रहाटे,सुनीता चव्हाण,जितेंद्र मोटे,वैशाली कोराटे ,दिलीप कुलकर्णी,सुभाष बोरसे,तानाजी ऐकोडे, आव्हाड काका,डी एम कोळी, प्रकाश शिंदे, सचिन लासुने, व इतर मान्यवर






