वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 5 तळेगाव दाभाडे येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन.
तळेगाव दाभाडे :
दिनांक 9 मार्च वार सोमवार रोजी वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक पाच येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर प्रगती कदम यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा सौ मीनाताई रामभाऊ गाढेकर , तळेगाव दाभाडे शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी माननीय श्रीम.अनिता वैद्य मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेखा मोहन केदारी, अगस्त्य फाउंडेशन च्या शिक्षिका, पालक वर्ग, सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व ईशस्तवनाने झाली. यानंतर पालक व विद्यार्थी यांनी आपले कला गुण सादर केले. काही महिला पालकांनी व्यावसायिक दृष्ट्या स्टॉल लावले होते. माता पालकांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली, त्यात सौ कविता लक्ष्मण पाखरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. शाळेतील सर्व विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या जम्पिंग जॅक या फन गेम चा मनसोक्त आनंद मुलींनी घेतला. उपस्थित सर्व महिला पालकांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सर्व स्पर्धांमध्ये विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. महिला प्रतिनिधी म्हणून सौ. वृंदा वळसंगकर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. सौ.प्रगती कदम यांनी मासिक पाळी आणि वैयक्तिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रशासन अधिकारी वैद्य मॅडम यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी कु. श्वेता कांबळे व कु . सान्वी मुळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन शाळा क्रमांक पाचच्या मुख्याध्यापिका सौ. दांगट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे आभार सौ. आशा गायकवाड यांनी मानले.






